बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अफगाणिस्तानातील सत्तासंघर्षाला नवं वळण, ‘या’ नेत्यानं तालिबानला धुडकावलं! म्हणाले…

काबूल | अफगाणिस्तानमध्ये तालिबान्यांनी पुर्णपणे कब्जा मिळवला आहे. अफगाणिस्तानचे राष्ट्रध्यक्ष अश्रफ गनी यांनी देश सोडला. त्यामुळे तालिबान्यांनी सत्ता स्थापनेचा दावा केला आहे. मात्र अशातच अफगाणिस्तानमधील सत्तासंघर्षाला नवं वळण आलं आहे. अफगाणिस्तानचे पहिले आणि माजी उपाध्यक्ष अमरूल्ला सालेह यांनी तालिबानला धुडकावलं असून आपण अजुनही हार मानली नसल्याचं म्हटलं आहे.

आपण देशाचे काळजीवाहू अध्यक्ष असल्याचं जाहीर केलं आहे. अफगाणिस्तान देशाच्या घटनेनुसार देशाचे राष्ट्रध्यक्षांच्या अनुपस्थितीत, त्यांनी देश सोडला, राजीनामा दिला किंवा त्यांचा मृत्यु झाला तर देशाचे पहिले उपाध्यक्ष काळजीवाहू अध्यक्ष बनतात. मी अजुनही देश सोडला नाही त्यामुळे मी काळजीवाहू अध्यक्ष असल्याचं  अमरूल्ला सालेह यांनी म्हटलं आहे.

मी सर्व नेत्यांच्या समर्थनासाठी संपर्क साधत असल्याचं अमरूल्ला सालेह म्हणाले. अमरूल्ला सालेह यांनी याबाबत ट्विट केलं आहे. अफगाणिस्तानच्या सत्तासंघर्षामध्ये काय होतं याकजे जगाचं लक्ष लागलेलं आहे.

दरम्यान, तालिबान्यांनी अफगाणिस्तानवर ताबा मिळवल्यावर पहिली पत्रकार परिषद घेतली आहे. यामध्ये आमच्यासोबत आधी जे लढले आहेत त्यांना आम्ही माफ केलं आहे. तालिबानी कोणत्याही आंतरराष्ट्रीय दूतावास किंवा संस्थेला नुकसान पोहोचवणार नसल्याचं तालिबानचे प्रवक्ते जबीहुल्ला मुजाहिदी यांनी म्हटलं आहे.

 

थोडक्यात बातम्या- 

तालिबानची पहिली पत्रकार परिषद, जगाला केलं ‘हे’ महत्त्वाचं आवाहन!

पुण्याची कोरोना मुक्तीच्या दिशेने वाटचाल, वाचा पुण्याची आजची आकडेवारी!

अफगाणिस्तानवर ताबा मिळवल्यावर तालिबान्यांनी दिला ‘हा’ पहिला आदेश!

चार दिवसांपासून खासदार उदयनराजे रुग्णालयात, पुण्यात उपचार सुरु!

कार प्रेमींसाठी जबरदस्त बातमी, ‘ही’ जबरदस्त गाडी लवकरच लाँच होणार!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More