बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आधी भुजबळ-फडणवीस अन् आता मोदी-पवार भेटीमुळे शिवसेनेचं भवितव्य अंधारात?

मुंबई | गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील राजकारणात अनेक वेगवेगळ्या घटना घडत असताना पाहायला मिळत आहेत. दोन दिवसांपूर्वी विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस तसेच राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांची सागर या निवासस्थानी भेट झाली होती. यावेळी माजी खासदार समीर भुजबळ आहे या भेटीदरम्यान उपस्थित होते.

विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि छगन भुजबळ यांच्या भेटीनंतर काल देवेंद्र फडणवीस हे दिल्लीला रवाना झाले होते. त्यानंतर आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे. या भेटीदरम्यान दोन्ही मोठ्या नेत्यांमध्ये तब्बल एक तास चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चा रंगू लागल्या आहेत.

दरम्यान, भुजबळ – फडणवीस भेटीनंतर आता मोदी – पवार भेट झाल्याने शिवसेनेचं भवितव्य अंधारात आहे की, काय? असा प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चिल्या जात आहे. त्यामुळे आता शिवसेनेला बाजूला करून येणारी 2024ची लोकसभा निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी भाजप बरोबर लढणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तसेच सध्याची महाराष्ट्राची राजकीय परिस्थिती पाहता सारं काही आलबेल नसल्याचं चित्र दिसून येत आहे.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यापूर्वी पंतप्रधानांना भेटले त्यानंतर महाराष्ट्रात 80 तासाचं सरकार स्थापन झालं होतं. त्यामुळे यावेळीही झालेली ही भेट महाराष्ट्रातील राजकीय समीकरण बदलणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. तसेच जर राष्ट्रवादीने भाजपबरोबर हातमिळवणी केली तर शिवसेनेच्या राजकीय भवितव्याचं काय? हा देखील प्रश्न या माध्यमातून उपस्थित करण्यात येत आहे.

 

थोडक्यात बातम्या –

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More