बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

परमबीरसिंग यांना पहिला झटका; सर्वोच्च न्यायालयानं दिला ‘हा’ सल्ला

मुंबई | परमबीर सिंग यांनी याचिकेत अनिल देशमुख यांची चौकशी करावी अशी मागणी न्यायालयात केली होती. तर दुसरीकडे मुंबई पोलीस आयुक्त पदावरुन करण्यात आलेली बदली रद्द करावी, अशी देखील मागणी याचिकेत करण्यात आली होती. त्यावर आज सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एसके कौल आणि आर. सुभाष रेड्डी यांच्या द्विसदस्यी खंडपीठाकडे सुनावणी होणार होती.

परमबीर सिंग यांच्यावतीने अ‌ॅड. मुकुल रोहतगी यांनी युक्तिवाद केला. मुंबई पोलीस आयुक्त पदावरुन करण्यात आलेली बदली ही क्वचीतच असल्याचं रोहतगी म्हणाले. त्यावर न्यायालयाने हे प्रकरण एवढं गंभीर होतं तर तुम्ही उच्च न्यायालयात का गेला नाही? याप्रकरणात गृहमंत्री अनिल देशमुख यांना पक्षकार का केलं नाही?, असा सवाल करतानाच सर्वोच्च न्यायालयाने रोहतगी यांना उच्च न्यायालयात जाण्याचा सल्ला दिला आहे.

अ‌ॅड. मुकुल रोहतगींनी या प्रकरणात राज्य सरकार माझ्या अशिलाच्या विरोधात गेली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार सिंग यांना दोन वर्ष पूर्ण होईपर्यंत त्यांच्या पदावरून हटवलं जाऊ शकत नाही, असा युक्तीवाद केला. त्यावेळी सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की, हे प्रकरण गंभीर आहे. तुम्ही संबंधित खात्याला पक्षकार का केलं नाही? तुम्ही कलम 32 अतंर्गत याचिका दाखल केली. मग कलम 226 अनुसार उच्च न्यायालयात का गेले नाही? तुम्ही तुमची एक संधी का सोडली? हे प्रकरण अत्यंत गंभीर असून त्याचा तुम्हाला फटका बसल्याचं आम्ही वारंवार सांगत आहोत, अस सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे. तसेच या प्रकरणावर उच्च न्यायालयाने लवकर सुनावणी करावी, असे निर्देशही दिले आहेत.

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयानं दिलेला निर्णय अत्यंत महत्त्वाचा आहे. सिंग यांनी आधीच उच्च न्यायालयात जायला हवं होतं. त्यांनी तसं न करता सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. यावरून त्यांनी उच्च न्यायालयावर अविश्वासही दाखवला असं म्हणावं लागेल, असं अ‌ॅड. असीम सरोदे यांनी सांगितलं.

थोडक्यात बातम्या

“तेव्हा मी खूप नाराज झाले होते”, रिंकू राजगुरुचा मोठा खुलासा

सरकारच्या अडचणीत आणखी वाढ; पुण्यातील कारागृह अधीक्षकाची ‘या’ कारणाने इच्छामरणाची मागणी

संगीत क्षेत्रात राष्ट्रीय पुरस्कार पटकावणारी सावनीची वाचा कहानी

‘फडणवीस सरकारच्या काळात आरएसएसचा वाटा किती?’; नाना पटोलेंचा फडणवीसांना सवाल

धक्कादायक! पतीच्या ह्रदयविकाराने झालेल्या मृत्यूनंतर पत्नीनेही सोडला प्राण; 8 दिवस मृतदेह कुजत होता फ्लॅटमध्ये

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More