Loading...

नाराजी नाट्यानंतर पंकजा मुंडेंनी केला मोठा खुलासा

मुंबई | भाजपच्या नेत्या आणि माजी महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांच्या फेसबुक पोस्टनंतर राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आलं आहे. त्यावर पंकजा मुंडेंनी प्रतिक्रिया दिली आहे. त्या पक्ष सोडणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

मी 12 डिसेंबरला बोलेल असं मी सांगितलं होतं. मला आत्मचिंतनासाठी आणि स्वतःशी बोलण्यासाठी वेळ हवा आहे. तो वेळ मला दिला पाहिजे. मी ती पोस्ट आत्ता केली आणि आत्ताच त्यावर बोलणं, भाष्य करणं मला शक्य नाही, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

Loading...

मी दरवर्षी गोपीनाथ गडावर मोठा कार्यक्रम घेते. माझ्या पोस्टवर सुरुवातीला सर्वच चॅनलने व्यवस्थित बातमी दिली. मात्र, एक दोन वर्तमानपत्रांनी पंकजा मुंडे पक्ष सोडणार अशी बातमी केली. यानंतर या सर्व चर्चेला वेगळा सूर आला आणि वेगळ्या पद्धतीने हाताळणी सुरु आहे. त्यामुळे मी खरंच खूप दुःखी आणि व्यथित आहे, असंही त्यांनी सांगितलं.

माझ्या फेसबुक पोस्टवरील पक्षांतराच्या बातम्यानंतर उलट माझ्यावरच पदासाठी मी हे करत असल्याचा आरोप होत आहे. खरंतर मला कुठलं पद मिळू नये म्हणून तर असं सुरु नाही ना असा मला प्रश्न पडला आहे, असं त्या म्हणाल्या.

Loading...

महत्वाच्या बातम्या- 

 

 

Loading...

 

Loading...