महाराष्ट्र मुंबई

रिलायन्स इंडस्ट्रीजचं स्तुत्य पाऊल; कोरोना उपचारासाठी भारतातलं पहिलं स्वतंत्र रुग्णालय मुंबईत सुरू

मुंबई | वाढत्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असताना रिलायन्स इंडस्ट्रीजने मुंबईत विशेष रुग्णालय सुरू केलं आहे. अंधेरी येथील सेव्हन हिल्स रुग्णालयात कोरोनाबाधितांवर उपचार करण्यासाठी स्वतंत्र 100 खाटांची सुविधा करण्यात आली आहे.

कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर देशात या धर्तीचे पाऊल पहिल्यांदाच उचललं गेलं आहे. अवघ्या दोन आठवडय़ांत याबाबतची सुसज्जता समूहाने केली आहे. समूहाच्या रिलायन्स  फाऊंडेशन या सेवाभावी संस्थेद्वारे रिलायन्स इंडस्ट्रीजला हे शक्य झाल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे.

समूहामार्फत चालविल्या जाणाऱ्या महाराष्ट्रातील लोधिवली येथील रुग्णालयात विलगीकरण सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तर रिलायन्स लाइफ सायन्सेसमध्ये चाचणी सुविधा आहे.

दरम्यान, रिलायन्स फाऊंडेशनमार्फत विविध शहरांमध्ये गरजूंना मोफत जेवण पुरवलं जाणार आहे. तसेच कोरोना रुग्णांसाठी वापरल्या जाणाऱ्या सर्व आपत्कालीन सेवा वाहनांसाठी मोफत इंधन उपलब्ध करून दिलं जाणार आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

सावधान… कोरोनाग्रस्तांची संख्या पोहचली 97 वर; नागरिकांनो आता तरी घराबाहेर पडू नका

“आता रस्त्यांवर फिरणाऱ्यांची गय करणार नाही… सगळं तुमच्यासाठीच चाललंय एवढंही कळू नये”

महत्वाच्या बातम्या-

‘कोरोना रोखण्यासाठी भारताने घेतलेले निर्णय योग्यच’; WHO कडून भारताचं कौतुक

महाराष्ट्रातील पहिल्या कोरोनाबाधित दाम्पत्याने कोरोनाविरोधातील लढाई जिंकली

मध्य प्रदेशात सत्तापालट; शिवराजसिंह चौहान मुख्यमंत्रिपदी विराजमान

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या