बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मुकेश अंबानींची मोठी उडी! आता पेट्रोलियम क्षेत्रात घडणार नवी क्रांती?

मुंबई | नवी मुंबईतील नावडे येथे पहिले वहिले Jio-bp ब्रँडेड मोबिलिटी स्टेशन लाँच करण्यात आले आहे. रिलायन्स इंडस्ट्रिज लिमिटेड आणि bp चा इंधन आणि गतीशिलता यांचा संयुक्त उपक्रम रिलायन्स bp मोबिलिटी लिमिटेड यांनी मुंबईत हे स्टेशन लाँच केले आहे. Jio-bp ग्राहकांना मोठ्या प्रमाणात इंधन पर्याय उपलब्ध करून देणारे जागतिक दर्जाचे मोबिलिटी स्टेशनचे नेटवर्क आणत आहे.

आगामी काळात तब्बल 1 हजार 400 पेक्षाही जास्त इंधन पंपाचे विद्यमान नेटवर्क Jio-bp नावाने पुनब्रँड केले जाणार आहे. आगामी काळातील इंधनाची मोठी मागणी बघता Jio-bp मोबिलिटी स्टेशनची रचना करण्यात आली आहे. ग्राहकांना उत्तम सेवेचा अनुभव देण्यासाठी Jio-bp सज्ज झाले आहे. Jio-bp मोबिलिटी स्टेशन ग्राहकांसाठी सर्व सोयींची श्रेणी एकत्र आणतात.

यात EV चार्जिंग, जोडलेले इंधनच नाही तर प्रवासी ग्राहकांसाठी अन्न आणि अल्पोपहाराच्या सुविधेचा देखील समावेश आहे. Jio-bpची कालांतराने कमी अधिक कार्बन सोल्युशन करण्याची देखील योजना आहे. Jio-bp ग्राहकांना चांगल्या दर्जाचे विभेदित इंधन अर्थात डिफरन्शिअल फ्युएल, चांगल्या सुविधा, वंगण, प्रगत कार्बन मोबिलिटी सोल्युशन उपलब्ध करून देणार आहे.

Jio-bp मोबिलिटी स्टेशनचे नेटवर्क ग्राहकांना अनेक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देत आहे. भारतभर EV चार्जिंगची पायाभूत सुविधा, वाईल्ड बीन कॅफे, आंतरराष्ट्रीय ऑन द मूव्ह ब्रँड यासोबतच 2 चाकी वाहनांसाठी कॅस्ट्रॉल ऑईल चेंज मोफत असणार आहे. तर जलद आणि विश्र्वासार्ह तेल बदलण्याच्या सेवेसह Jio-bp जागतिक दर्जाचे रिटेलिंग अनुभव प्रदान करणारे अनेक इंधन पर्याय उपलब्ध करून देणार आहे.

थोडक्यात बातम्या-

बाप बापच असतो! ग्रामपंचायत निवडणुकीत बाप-लेक भिडले अन्…

”ती’ खोली हेच स्वातंत्र्याचं खरं सत्य’; सेल्युलर जेलला भेट दिल्यानंतर कंगना भारावली

देशासमोर नवं संकट! ‘या’ राज्यात सापडला कोरोनाचा नवा व्हेरियंट

“त्यांना हवं असेल तर ते मला गोळ्या देखील घालू शकतात”

“तुम्ही करा रे कितीही हल्ला, लय मजबूत भिमाचा किल्ला”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More