बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पुण्यातील तरुणीशी आधी इन्स्टाग्रामवर ओळख, त्यानंतर तिच्याच घरात घुसून केलं संतापजनक कृत्य

पुणे | आजकालच्या तरुण पिढिला नवीन ओळखी, नवीन मित्र, मैत्रिणी बनवायला फार आवडतात. या ओळखींसाठी मग ते सोशल मीडीयाचा वापर चालू करतात. यामध्ये सर्वात जास्त वापरलं जाणारं माध्यम म्हणजे इन्स्टाग्राम. अशाप्रकारे पुण्यातील एका तरुणीने इन्स्टाग्रामवरुन एक नवीन मित्र बनवला. मात्र तिच्या मित्राने नंतर जे कृत्य केलं त्यानंतर संपुर्ण परिसरात एकच खळबळ माजली आहे.

मंगळवारी एका तरुणाने अल्पवयीन मुलीवर घरात घुसून बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. घटनेनंतर आरोपी फरार झाला आहे. याप्रकरणी अल्पवयीन तरुणीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आली आहे. संबंधित आरोपीचं नाव अक्षय साबळे असं आहे.

पीडित तरुणी आणि आरोपी अक्षय या दोघांची ओळख इन्स्टाग्राम या सोशल माध्यमावर झाली होती. त्यानंतर ते दोघे सतत एकमेकांसोबत बोलत असायचे. संवादातून आरोपीने अल्पवयीन तरुणीचा विश्वास संपादन केला. त्यानंतर मंगळवारी दुपारी तरुणीच्या घरात कोणी नसल्याचे पाहून आरोपीने घरात घुसुन तरुणीच्या विश्वासाचा पालापाचोळा केला.

दरम्यान, पीडित तरुणीची आई घरी आल्यानंतर मुलीने घडलेला सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर आईने बिबवेवाडी पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार नोंदवली आहे. तसेच आरोपीचा शोध सुरु असल्याचे बिबवेवाडी पोलिसांनी सांगितलं आहे.

थोडक्यात बातम्या-

चंद्रकांत पाटील हा मोदी लाटेत लॉटरी लागलेला माणूस आहे- अजित पवार

“मुख्यमंत्र्यांच्या नाकर्तेपणामुळे राज्यात प्रत्येक ठिकाणी स्थानिक प्रशासन मुजोर झालंय”

पुणे हादरलं! निवृत्त पोलीस अन् गुन्हेगारात वाद झाल्यानंतर गुन्हेगाराचा विचित्र मृत्यू

संजय राऊतांनंतर राष्ट्रवादीच्या रुपाली चाकणकर बेळगावात, मराठी माणसाचा प्रचार करणार!

“ज्यांनी भांडणं लावून लोकांची घरं फोडली, त्यांच्या घरात आता टोकाची भाडणं”

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More