Top News कोरोना देश पुणे

आधी माझा देश, जगाने धीर धरावा – अदार पुनावाला

Photo Credit - Twitter/ @adarpoonawalla

पुणे | पुण्यातील सीरम इन्स्टीट्यूटच्या कोविशिल्ड कोरोना लसीला जगभरातून जोरदार मागणी आहे. भारतात दिली तर कमी रुपयांत आणि जगभरात दिली तर ते देश सांगतील त्या किंमतीला विकत घेतील अशी परिस्थिती आहे. मात्र, सीरमचे सीईओ अदार पुनावाला यांनी याबाबत मोठे वक्तव्य केले आहे.

पुनावाला यांनी ट्विट करत उत्तर दिले आहे की, आदरणीय देश आणि सरकारे तुम्ही लोक कोविशिल्ड लसीच्या पुरवठ्याची वाट पाहत आहात. मी तुम्हा सर्वांना विनम्रतेने निवेदन करतो की, तुम्ही सर्वांनी धीर धरावा. सीरम इंस्टीट्यूट ऑफ इंडियाने भारतातील कोरोना लसीकरणाच्या गरजांना प्राथमिकता देण्याचा निर्णय घेतला आहे, असं पुनावाला यांनी ट्विटद्वारे संदेश दिला आहे.

आम्ही आमच्याकडून पूर्ण प्रयत्न करत आहोत. सीरम इट्यून्स्टीट ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि ब्रिटीश-स्वीडनची कंपनी एस्ट्राझिनेकाने विकसित केलेल्या कोविशिल्ड लसीचे उत्पादन घेत आहे. सीरम भारत सरकारसोबत अन्य बाजारांसाठीही कोरोना लस बनवत आहे, असंही त्यांनी यावेळी सांगितलं आहे.

दरम्यान, भारतामध्ये कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढू लागले आहेत. अशावेळी कोरोनाचा उद्रेक थांबविण्यासाठी देशात कोरोना लसीची मोठी गरज आहे. देशात खरी गरज असताना भारताने जगाशी असलेले देणे न विसरता कोरोना लस विविध देशांना पुरवत आहे. संयुक्त राष्ट्रांच्या शांतता सैनिकांना भारताने दोन लाख कोरोना लसीचे डोस देऊ केले आहेत, असंही त्यांनी ट्विटद्वारे सांगितलं आहे.

थोडक्यात बातम्या – 

अभिनेत्री प्रिया बापटचं पारंपरिक अंदाजातलं ग्लॅमरस फोटोशूट, पहा तिचे अदाकारी फोटोज!

धक्कादायक! थुंकी लावून लोकांना वाढायचा, समोर आला किळसवाणा प्रकार, पाहा व्हिडीओ

“मोदी साहेब ‘मन की बात’मधून चांगलं बोलतात परंतु कृती काहीच करत नाही”

‘या’ भाजप नेत्याला ड्रग्ज घेण्याची सवय, कोलकाता पोलिसांचा खळबळजनक दावा

महिलेनं कोरोनाचा नियम तोडला, पावती फाडण्याऐवजी पोलिसानं किस करुन सोडून दिलं! पाहा व्हिडीओ

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या