Top News कोरोना पुणे महाराष्ट्र

सर्वात आधी पुणेकरांना कोरोनाची लस द्या; थेट पंतप्रधान मोदींकडे मागणी

Photo Credit- Facebook/ Narendra Modi Twitter/ Seum Institute

पुणे | कोरोनाचा प्रादुर्भाव गेल्या काही महिन्यांमध्ये कमी झाला होता. मात्र गेल्या काही दिवसांमध्ये पुण्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. याच पार्श्वभूमीवर पुणेकरांचे सर्वात आधी लसीकरण करण्यात यावं, अशी मागणी करत केंद्रीय मंत्री डॉ. हर्षवर्धन यांना पुणे प्लॅटफॉर्म फॉर कोव्हिड रिस्पॉन्सच्या वतीने पत्र देण्यात आलं.

पुण्यातील पॉझिटिव्हिटी रेट 10 टक्यांवर गेला आहे. त्याचप्रमाणे पुण्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. हे सगळं लक्षात घेता ही मागणी करण्यात आलं असल्याचं पुणे प्लॅटफॉर्म फॉर कोव्हिड रिस्पॉन्सचे प्रमुख सुधीर मेहता यांनी यांनी सांगितलं. ते लोकमतशी बोलत होते.

पुण्यात पुन्हा कोरोनाची लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पुढील तीन महिन्यात पुण्यातील लसीकरण पूर्ण झालं, तर कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा धोका टळू शकतो. सिरमकडे लस शिल्लक आहे आणि ती पुण्यातच आहे. त्यामुळं पुणेकरांचं लसीकरण पूर्ण करावं असं आमचं म्हणणं असल्याचं सुधीर मेहतांनी सांगितलं.

दरम्यान, पुण्यात कोरोनाचा संचार वाढल्यामुळे यंत्रणांमध्ये समन्वय ठेवण्यासाठी मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्स एॅण्ड इंडस्ट्रीजच्या वतीने पुढाकार घेऊन एका गटाची स्थापना करण्यात आली आहे. त्यामध्ये शहरातील प्रमुख रुग्णालयांचे पदाधिकारी, पुणे-पिंपरीचिंचवडचे आयुक्त तसेच आरोग्य अधिकारी आणि पुण्यातील एमसीसीआयएमचे मेंबर्सचा समावेश आहे.

थोडक्यात बातम्या –

भेटी लागे जिवा… विठुराया आणि भक्ताच्या ‘या’ भेटीनं साऱ्यांचे डोळे पाणावले!

गुंड गजानन मारणेची तुरुंगातून सुटका, 500 गाड्या स्वागताला; पाहा 5 व्हायरल व्हिडीओ-

आयपीएलच्या लिलावाआधी मोठी घोषणा, ‘या’ सघानं घेतला नाव बदलण्याचा निर्णय!

रस्ते वाहतूक मंत्रालयाची मोठी घोषणा, ‘त्या’ वाहनचालकांना आता थेट मिळणार वाहन परवाना!

ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘जिवेत् शरद: शतम् योजना’; नेमकी काय आहे ही योजना???

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या