“मी बरा होऊ नये म्हणून काहींनी देव पाण्यात ठेवले, तेच पक्ष बुडवायला निघालेत”
मुंबई | शिवसेना पक्षाला बंडाची झळ लागली आणि त्यांच्या पक्षातील दोन तृतीयांश नेते पक्षाला राम राम करुन निघून गेले. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेला उतरती कळा आणली. त्यांच्यामुळे शिवसेनेला हे दिवस आले. त्यांच्या मागे भाजपचा देखील हात आहे. आता या परिस्थितीत पक्षाची आणि पक्षप्रमुखांची भूमिका काय असणार आहे? यासाठी खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी उद्धव ठाकरेंची मुलाखत घेतली.
या मुलाखतीचा पहिला भाग शिवसेनेचे मुखपत्र दैनिक सामना (Daily Samna) मध्ये प्रकाशित झाला आहे. उर्वरीत दुसरा भाग उद्या (दि. 27) जुलै रोजी प्रकाशित होणार आहे. या मुलाखतीत उद्धव ठाकरे रोखठोक बोलले आहेत. त्यात त्यांनी शिवसेनेच्या बंडखोरांवर आरोप केले आहेत तर काही गौप्यस्फोट देखील केले आहेत. उद्धव ठाकरेंनी गतवर्षी दिवाळीच्या दरम्यान त्यांच्यावर झालेल्या शस्त्रक्रियांची माहिती दिली.
यावेळी मी गुंगीत होतो, आजारी होतो आणि रुग्णालयात होतो. त्यावेळी काही जणांनी बाहेर हालचाली सुरु केल्या. एकीकडे राज्यातील जनता मी बरं व्हावं यासाठी देवाला अभिषेक घालत होती तर दुसरीकडे माझी प्रकृती सुधारु नये म्हणून काही लोकांनी देव पाण्यात ठेवले होते. आणि याच लोकांनी आता पक्ष बुडवण्याचा घाट घातला आहे, असे गंभीर आरोप आणि गौप्यस्फोट उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) या मुलाखतीत केलेत.
माझ्यावर जी मानेची शस्त्रक्रिया झाली. त्याचे धोके मला डॉक्टरांनी आधीच सांगितले होते. माझ्यावर शस्त्रक्रिया झाली आणि एक दिवस मी झोपेतून उठलो आणि आळस देत असताना माझ्या मानेखालील सर्व हालचाली बंद झाली. श्वास घेताना माझे पोट हालत नव्हते. त्या काळात मी भयंकर आजारी होतो. त्याकाळात ज्यांच्यावर जबाबदारी होती त्यांनी माझ्या गैरहजेरीचा फायदा घेत डाव साधला, असंही त्यांनी सांगितलं.
थोडक्यात बातम्या –
‘एकनाथ शिंदेंची भूक अजून भागली नाही का?’; अजित पवारांची मुख्यमंत्र्यांवर बोचरी टीका
‘जन्म दिला त्याच आईला गिळायला निघालेली ही अवलाद’; उद्धव ठाकरेंनी बंडखोरांना सुनावलं
जितेंद्र आव्हाडांची बाबासाहेब पुरंदरेंवर टीका, म्हणाले…
राष्ट्रपतींचा शपथविधी 25 जुलैलाच का होतो?, वाचा सविस्तर
अविवाहितेच्या मुलांना फक्त आईचं नावही लावता येणार, ‘या’ उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
Comments are closed.