महाराष्ट्र मुंबई

कोरोनाचा महाराष्ट्रात पहिला तर देशात तिसरा बळी!

मुंबई| मुंबईमध्ये कोरोनामुळं 64 वर्षाच्या पुरूषाचा मृत्यु झाल्याचं समोर आलं आहे. महाराष्ट्रात कोरोनामुळं गेलेला हा पहिला बळी असून देशात कोरोनामुळं गेलेल्या बळींची संख्या आता  3वर जाऊन पोहोचली आहे.

मुंबईतील कस्तुरबा रूग्णालयात या व्यक्तीवर उपचार सूरू होते.  आज या व्यक्तीची कोरोनाशी सूरु असलेली झुंज अखेर संपली. कस्तुरबा रूग्णालयात या व्यक्तीनं अखेरचा श्वास घेतला.

देशातील कोरोनाग्रस्त रूग्णांची संख्या आता 125वर गेली आहे. यामध्ये महाराष्ट्रात 39 कोरोनाबाधित रूग्ण आढळलेले आहेत. संपूर्ण देशात भितीचं वातावरण आहे. केंद्र तसंच राज्यसरकारकडून कोरानाचा  फैलाव रोखण्यासाठी विविध पावलं उचलली जात आहेत.

दरम्यान, महाराष्ट्रात सर्व शाळा, महाविद्यालयं बंद करण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे. सर्वांना काळजी घेण्याचं आवाहन सरकारकडून केलं जात आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

तुला मला का भेटायचं होतं?; राज ठाकरेंच्या प्रश्नावर चिमुकलीचं गोंडस उत्तर, पाहा व्हिडीओ

“आम्ही उपाशी आहेत की नाही हे जनता ठरवेल मात्र तुम्ही नेहमी कुपोषित दिसता”

महत्वाच्या बातम्या-

…अन् तेव्हापासून आईनं माझं नावं दगडू असं ठेवलं- सुशीलकुमार शिंदे

घाबरू नका फोन करा, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचा कोरोनासाठी नवीन हेल्पलाईन नंबर जारी!

संभाजीराजेंनी माजी लष्करप्रमुखांना सांगितला मराठ्यांचा गौरवशाली इतिहास; त्यावर ते म्हणाले मला तो फोटो द्या!

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या