बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

धनंजय मुंडेंचा रूग्णालयातील पहिला फोटो समोर, पाहा फोटो

मुंबई | राष्ट्रवादीचे नेते व सामाजिक न्यायविकास मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या तब्येतीत अचानक बिघाड झाल्याने त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. धनंजय मुंडेंना ह्रदयविकाराच्या सौम्य झटका आला असल्याचं म्हटलं जात असताना उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी या वृत्ताचं खंडण केलं.

धनंजय मुंडेंना भोवळ आल्याने त्यांची शुद्ध हरपली. त्यामुळे त्यांना उपचारासाठी रूग्णालयात दाखल केल्याचं अजित पवारांनी स्पष्ट केलं. धनंजय मुंडे अजूनही रूग्णालयात दाखल असून त्यांचा रूग्णालयातील पहिला फोटो समोर आला आहे.

धनंजय मुंडेंच्या इन्स्टाग्रामवरील एका फॅन पेजवरून हा फोटो शेअर करण्यात आला आहे. या फोटोवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटायला सुरूवात झाली आहे. धनंजय मुंडेंना सध्या सक्तीची विश्रांती घेण्याचा सल्ला देण्यात आला असून पुढील 2-4 दिवसात त्यांना रूग्णालयातून डिस्चार्ज मिळेल.

दरम्यान, सर्वपक्षीय नेत्यांकडून धनंजय मुंडेंच्या तब्येतीची विचारपूस करण्यात आली आहे. सुप्रिया सुळे, पंकजा मुंडे, प्रीतम मुंडे, अजित पवार, राजेश टोपे, प्रवीण दरेकर, नाना पटोले व इतर अनेक नेते व मंत्र्यांनी धनंजय मुंडेंची भेट घेऊन लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या.

 

थोडक्यात बातम्या-

7th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर; सरकारने दिला मोठा दिलासा

“…तर अरविंद केजरीवालांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा”

“खरे मास्टरमाईंड तर उद्धव ठाकरे”; सोमय्यांच्या आरोपाने खळबळ

रावसाहेब दानवेंकडून महाविकास आघाडीला अमर, अकबर, अँथनीची उपमा, म्हणाले…

बाळासाहेबांच्या शिवाजी पार्कवरील स्मृतिस्थळाची RSSला अडचण; वाद पेटण्याची शक्यता

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More