औरंगाबाद | मराठा आरक्षणासाठी शिवसेना आमदार हर्षवर्धन जाधव या मराठा आमदाराने राजीनामा दिला आहे. मराठा आरक्षणासाठी राजीनामा देणारे हे पहिलेच आमदार ठरले आहेत.
मराठा आरक्षणाावरून मराठा मोर्चेकरी आक्रमक झाले आहेत. ठिकठिकाणी मोर्चाला हिंसक वळण लागलंय. मराठा मोर्चेकऱ्यांकडून मराठा आमदारांच्या प्रतिकात्मक तिरड्या उचलल्या जात आहेत.
दरम्यान, मराठा आरक्षणासंदर्भात सरकारने अध्यादेश काढावा अन्यथा मी राजीनामा देईल, असा इशारा जाधवांनी दिला होता. त्यामुळे त्यांनी आपला राजीनामा देऊन दिलेला शब्द पाळलाय.
महत्त्वाच्या बातम्या–
-भाजपमध्ये मुख्यमंत्री बदलाच्या हालचाली सुरु!
-मराठा क्रांती मोर्चाच्या ‘मुंबई बंद’वर दिग्दर्शक केदार शिंदेंचा संताप
-काकासाहेब शिंदेच्या मृत्यूनं मन विषण्ण; पंकजा मुंडे वाढदिवस साजरा करणार नाहीत!
-हार्दिक पटेलला मोठा झटका, 2 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा
-मुंबई पुणे महामार्गावर दगडफेक; पोलिसांचा हवेत गोळीबार