पुणे महाराष्ट्र

पुण्यातील ‘या’ भागात हर्ड इम्युनिटी विकसित झाल्याचा अंदाज

पुणे | पुण्यातील लोहिया नगर या प्रभागात आता हर्ड इम्युनिटीची लक्षणे आढळून आली आहेत. सिरो सर्व्हेमध्ये लोहिया नगरमध्ये कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळून आले होते. मात्र आता या प्रभागातील कोरोना झालेल्या 85 टक्के लोकांमध्ये अँटीबॉडिज निर्माण झाल्या आहेत.

पुण्यातील पाच प्रभागांमध्ये नुकतेच एक सर्वेक्षण करण्यात आले होते. यापूर्वी जुलै ते ऑगस्ट या काळात याच प्रभागांमध्ये सिरो सर्व्हे झाला होता. तेव्हा या प्रभागांमधील जवळपास 51 टक्के लोकांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झालं होतं.

लोहियानगरमध्ये कोरोनाच्या नव्या रुग्णांच्या संख्येत लक्षणीय घट झाली आहे. त्यामुळे लोहिया नगरमध्ये कोरोनावर मात करणारी हर्ड इम्युनिटी विकसित झाल्याचा अंदाज तज्ज्ञांकडून वर्तवण्यात येत आहे.

ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीपासून ते नोव्हेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात साधारणत: शहरात दिवसाला दीडशे ते दोनशे कोरोनाबाधित आढळून येत होते. पण गेल्या दोन दिवसांपासून यात वाढ होत आहे.

महत्वाच्या बातम्या-

‘…आणि मग Penguin Gang ची पार्टी सुरू’; नितेश राणेंची जहरी टीका

…मग तुम्ही सत्तेत का बसला आहात?- चंद्रकांत पाटील

“मुंबई महापालिकेवरील भगवा उतरवण्याची अवदसा आठवली असेल तर…”

वीजबिल माफीसाठी सलून व्यावसायिक आक्रमक, सरकारविरोधात राज्यभर आंदोलन करणार

‘भाजप हवेत चालणारा पक्ष असेल तर राष्ट्रवादी…’; चंद्रकांत पाटलांचा राष्ट्रवादीला टोला

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या