‘शिकारी’ चित्रपटाचा पहिला सुपरहॉट टीझर प्रदर्शित

मुंबई | शिकारी या मराठी चित्रपटाच्या पोस्टरवरुन मोठी चर्चा सुरु असतानाच आता या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. अभिनेत्री नेहा खानचा हॉट अंदाज या चित्रपटाच्या टीझरमध्ये पहायला मिळतोय. 

शिकारी चित्रपटाचं पोस्टर रिलीज करण्यात आलं तेव्हा वेगवेगळे तर्क लढवण्यात आले होते, मात्र टीझरही ते तर्क पूर्ण करु शकले नाहीत. त्यामुळे या सिनेमाबाबत उत्सुकता वाढली आहे. 

महेश मांजेकरांचा हा चित्रपट असून विजू माने दिग्दर्शन करणार आहेत. तर प्रसाद ओक, मृण्मयी देशपांडे, भाऊ कदम, भारत गणेशपुरे आणि वैभव मांगले यांच्या या चित्रपटात भूमिका आहेत. 

पाहा टीझर-