राज्यातील पेट्रोल-डिझेलचे दर कमी होणार?; अजित पवारांनी दिली महत्त्वाची माहिती
मुंबई | गेल्या काही दिवसांपासून देशात आणि राज्यात पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये मोठी वाढ होताना दिसत आहे. पेट्रोल आणि डिझेलचे दर सातत्याने वाढत असल्याने नागरिक त्रस्त आहेत. त्यातच आता राज्याचे अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरावर भाष्य केलं आहे.
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आमदारांच्या विकास निधीमध्ये मर्यादा होत्या. जो निधी उपलब्ध आहे त्यातून राज्याच्या विकासाला कोणतीही खिळ बसू द्यायची नव्हती. मात्र, आम्ही जे जे काही करता येईल ते केलेलं आहे. या वर्षात रस्ते आणि विकास महामंडळाला विक्रमी असा 21 हजार कोटींचा निधी दिला आहे. आपण राज्यामध्ये कोणताही कर लावलेला नाही, असं अजित पवारांनी सांगितलं.
गॅस सिलेंडरच्या संदर्भात 1 हजार कोटींचा टॅक्स माफ केला आहे. काहीजण सांगत आहेत की, राज्यानेही पेट्रोल आणि डिझेलवरील कर कमी करायला हवेत तर केंद्रानेही आपले दर कमी करावेत, असं अजित पवारांनी म्हटलं आहे. त्यामुळे आगामी काळात पेट्रोल आणि डिझेलवरील दर कमी होणार नाहीत, हे स्पष्ट होत आहे.
दरम्यान, आमच्या परिने आम्ही गॅसच्या किंमती कमी करण्याचा प्रयत्न केला.परंतु, आम्ही किंमती कमी केल्या तरी पेट्रोेल, डिझेल आणि गॅसच्या किंमती वाढतचं आहेत. साधारण उत्पन्नाच्या 3 टक्के कर्ज काढता येते आणि कर्ज काढण्याचे प्रमाण 3 टक्क्यांच्या आतचं ठेवलं आहे. उलट देशानेचं साडेसहा टक्के म्हणजेच आपल्यापेक्षा दुप्पट कर्ज उचलले आहे, असं अजित पवार म्हणाले.
थोडक्यात बातम्या-
कोरोनानंतर नव्या व्हायरसचा धुमाकूळ; ‘या’ आजाराची लक्षणंही कोरोना सारखीच
मी शरद पवारांचा माणूस आहे, हे लपून राहिलंय का? – संजय राऊत
संजय राऊतांचं मुंबईत शक्ती प्रदर्शन, भाजपवर हल्लाबोल करत म्हणाले…
“पुढची 25 वर्षे महाराष्ट्रात भाजपची सत्ता येणार नाही”
रोहित पवारांचा संजय राऊत यांना सल्ला, म्हणाले…
Comments are closed.