Top News आरोग्य महाराष्ट्र मुंबई

कोरोना महामारीच्या काळात पहिल्यांदाच कोकिलाबेन रूग्णालयात ‘ही’ मोठी शस्त्रक्रिया

मुंबई | कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रूग्णालयाने कोव्हिड- 19 महामारीदरम्यान मुंबईतील पहिलं हृदयप्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडलीये. हृदय प्रत्यारोपण करण्यात आलेली महिला 53 वर्षीय असून मुळची नांदेडची आहे. या महिलेचं हृदय निकामी झालं होतं त्यामुळे त्यांना हृदय प्रत्यारोपणाची गरज होती.

गेल्या आठ महिन्यांपासून हृदय प्रत्यारोपणाच्या यादीत या महिलेचं नाव समाविष्ट होतं. अवयवदात्यांचं तसंच अवयव प्रत्यारोपणाचे प्रमाण कोव्हिड दरम्यान कमी झाल्याने हृदय मिळण्याची शक्यताही कमी झाली. मात्र, 18 जुलै रोजी एका दात्याचे हृदय उपलब्ध झाल्याने या महिलेवर यशस्वीरित्या हृदय प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करण्यात आली.

कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रूग्णालयाच्या हृद्य आणि फुप्फुस प्रत्यारोपण केंद्राचे संचालक डॉ. नंदकिशोर तापडिया म्हणाले, “2009 मध्ये या रुग्णावर ओपन हार्ट व्हॉल्व्ह रिप्लेसमेंट करण्यात आलं होतं. त्यानंतर 2012 मध्ये त्यांची स्थिती बिघडण्यास सुरुवात झाली. गेल्या वर्षी या महिलेच्या हृद्याचे कधी न भरून येऊ शकणारं नुकसान झाल्याने गेल्या सहा महिन्यांपासून ही महिला अंथरूणास खिळून होती.

शस्त्रक्रियेदरम्यान, मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाल्याने प्रत्यारोपणाची प्रक्रिया आणखी गुंतागुंतीची झाली होती. सध्याची कोविडची परिस्थिती लक्षात घेता जास्त काळजी घेणं आवश्यक होतं. दरम्यान, शस्त्रक्रियेच्या यशासाठी आवश्यक असलेले सर्व निकष पाळण्यात आले. त्यामुळे प्रत्यारोपण यशस्वी ठरलं आणि आता रुग्णाची प्रकृती सुधारतेय.”

हे यशस्वी प्रत्यारोपण ट्रॅफिक पोलिस आणि अधिकाऱ्यांच्या पाठिंब्यामुळे यशस्वी ठरलंय. ट्रॅफिक पोलिसांनी ग्रीन कॉरिडॉरची यशस्वी अंमलबजावणी करत हृदय वेगाने आणि सुरक्षितपणे पोहोचेल याची खबरदारी घेतली. त्याचप्रमाणे दात्याच्या कुटुंबियांनीही सध्याच्या कठीण काळातही अवयवदानाचा निर्णय घेत मानवतेचं दर्शन घडवून रुग्णाचे प्राण वाचवलेत.

महत्त्वाच्या बातम्या-

धारावीचा धोका टळला अन् सुरू झालाय मुंबईतल्या या भागात कोरोनाचा हैदोस!

राज्यात कोरोनाचा हाहाकार…. काल दिवसभरात वाढले तब्बल एवढे हजार कोरोना रूग्ण

स्थलांतरित मजुरांच्या रोजगारासाठी सोनू सूदने उचललं मोठं पाऊल

‘वर्ल्डकप खड्ड्यात गेला तरी चालेल, पण आयपीएल व्हायला हवी’, पाकिस्तानच्या माजी खेळाडूचं वक्तव्य

समाजकार्यासाठी संपूर्ण जीवन समर्पित करणारे, ‘स्व’-रुपवर्धिनीचे ज्ञानेश पुरंदरे यांचं निधन

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या