बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पुण्यातील मानाच्या पाच गणपतींचं विसर्जन होणार ‘या’ वेळेत, मंडळांनी दिली माहिती!

पुणे | पुण्याची वैभवशाली गणपती मिरवणुक महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. ढोलताशांच्या गजरात तासनतास ही मिरवणुक चालते. मिरवणुक कोणत्या चौकात आली याची इत्यंभूत माहीती सर्वं गणेश भक्तांना असायची. मात्र, यंदाही कोरोनामुळे मिरवणुक होणार नसल्याने गणेश मंडळानी उत्सव मंडपामध्येच गणेश विसर्जन करण्याचा निर्णय घेतला आहे.

प्रशासना कडुन कोरोनामुळे गणेश विर्सजन मिरवणुकीसाठी नियमावली स्पष्ट करण्यात आली आहे. विर्सजनावेळी गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे विर्सजन मिरवणुकांना परवानगी देण्यात आली नाही. पुण्यातील परंपरेनुसार मानाचा पहिल्या कसबा गणपतीचं 11 वाजता उत्सव मंडपात विर्सजन करण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे.

त्यानंतर क्रमाक्रमाने प्रसिध्द मंडळांच्या गणेश मुर्तींचं विर्सजन केलं जाणार आहे. गणेश मंडळांच्या या वेळांमध्ये कसबा गणपतीनंतर 11.45 तांबडी जोगेश्वरी, 12.30 वाजता गुरूजी तालिम तर तुळशीबाग 1.15 वाजता, केसरी वाडा 2 वाजता विर्सजित होणार आहे.

दरम्यान, पुणे शहरातील सर्व दुकाने आणि शहर विर्सजना दिवशी बंद असणार आहे. यादिवशी फक्त अत्यावश्यक सेवा सुरू करण्यास परवानगी असणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत आज माहीती दिली. कोरोनाच्या सावटामुळे विर्सजन मिरवणुक होणार नसल्याचं अजित पवारांनी सांगितलं आहे.

 

थोडक्यात बातम्या –

पंतप्रधान मोदींना आपल्या मधुर आवाजात अमृता फडणवीसांनी दिल्या शुभेच्छा! पाहा व्हिडीओ

पुणे कोरोना अपडेट; जाणून घ्या आजची आकडेवारी एका क्लिकवर

राज्यातील ‘या’ भागात मुसळधार पावसाची शक्यता; हवामान खात्याचा अंदाज

सोनू सूदच्या अडचणीत वाढ???, आयकर विभागाच्या हाती लागली ‘ती’ कागदपत्रे!

नरेंद्र मोदींच्या वाढदिवसादिवशी लसीकरणाचा नवा विक्रम, तब्बल ‘इतक्या’ लोकांनी घेतले डोस

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More