बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

लेकीने वडिलांना हॉटेलमध्ये दारु पाजली, जेवू घातलं अन् नंतर जाळून टाकलं; कारण ऐकून पोलिसही हादरले

कोलकत्ता | पश्चिम बंगालमध्ये एका निर्दयी लेकीने स्वतःच्याच बापाला जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विवाह झालेल्या 22 वर्षाच्या तरुणीने हे कृत्य केलं आहे. ही घटना सिसीटीव्ही मध्ये रेकाॅर्ड झाली असून मुलीच्या एका नातेवाईकानीच याबाबत तक्रार नोंदवली होती.

22 वर्षीय या तरुणीचं नाव पियाली असून 56 वर्षीय तिच्या वडिलांचं नाव बिश्वनाथ असं होतं. रविवारी रात्र पियालीने तिच्या वडिलांना एका हाॅटेल मध्ये नेलं. हाॅटेलमध्ये त्यांना जेवण दिलं आणि दारु देखील पाजली. त्यानंतर दोघेही शतपावली करण्यासाठी जात असताना बिश्वनाथ दारुच्या नशेत फुथपाथवरचं झोपी गेले. यादरम्यान पियालीने त्यांच्यावर तेल ओतून त्यांना जाळून टाकल्याची माहिती आहे.

पियालीची चौकशी केल्यानंतर मिळालेल्या माहितीनुसार पियालीच्या लहानपणी तिच्या आईचं निधन झालं. त्यानंतर बिश्वनाथ रोज पियालीचा लैंगिक शोषण करत असल्याचं तिने चौकशी दरम्यान सांगितलं. पियालीचं लग्न झाल्यानंतर तिच्यावर वडिलांकडून होणारा आत्याचार थांबला. मात्र काही कारणांमुळे सासरी न पटल्याकारणाने ती पुन्हा माहेरी राहीला आली. त्यानंतर पुन्हा बिश्वनाथने तिचं लैंगिक शोषण करण्यास चालू केलं, असं पियालीने सांगितलं.

दरम्यान, पियालीने दिलेल्या माहितीची सत्यता पोलिस अद्दाप पडताळत आहेत. या तरुणीने आपला गुन्हा कबुल केला असून तिला 29 मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

थोडक्यात बातम्या-

15 वर्षाच्या लेकीने सख्ख्या आईची गळा चिरून केली हत्या; कारण ऐकून सुन्न व्हाल

काँग्रेसला धक्का! ‘हा’ माजी आमदार लवकरच राष्ट्रवादीत प्रवेश करणार

अन् पती पत्नीनं रचला इतिहास; राज्याच्या राजकारणात पहिल्यांदाच जुळून आला ‘असा’ योग!

नवनीत राणांची बाजू घेत सरकारवर टीका करणाऱ्या चित्रा वाघ यांना चाकणकरांनी सुनावलं, म्हणाल्या…

मुलगी दिली नाही म्हणून त्याने मुलीच्या आईलाच फूस लावून पळवलं, अन्…

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More