बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

महाराष्ट्रात म्युकरमायकोसिस आजाराचा पहिला बळी?; रुग्णालय प्रशासनाचा बोलण्यास नकार!

ठाणे | कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने महाराष्ट्रभर हाहाकार माजवला असतानाच आता नव्या एका आजाराने डोकं वर काढलं आहे. म्युकरमायकोसिस या आजाराचे काही रुग्ण महाराष्ट्रात सापडले आहेत. त्यातच एका वृद्धाचा म्युकरमायकोसिस या आजाराने मृत्यु झाल्याचं समोर येत आहे.

कल्याण डोंबिवलीमध्ये या आजाराने प्रवेश केला असून डोंबिवलीतील एका खासगी रुग्णालयामध्ये 6 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दरम्यान, महाराष्ट्र सरकारने महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत या आजारावर इलाज मोफत करण्यात येणार असल्याचं स्पष्ट केलं आहे.

डोंबिवलीमध्ये आज 69 वर्षीय बाजीराव काटकर यांचा म्युकरमायकोसिस या दुर्मिळ आजाराने मृत्यू झाल्याची माहिती त्यांचा मुलगा वैभव काटकर यांनी दिली आहे. रुग्णालय प्रशासन मात्र याबाबत कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यास तयार नाही. डोंबिवलीतील एका खासगी रुग्णालयात हा प्रकार घडला. दरम्यान अद्याप या प्रकरणात अधिकृत डॉक्टरांची प्रतिक्रिया आल्यास नेमकं या प्रकरणाचा उलगडा होईल, पण प्राथमिकरित्या हा म्युकरमायकोसिसचाच बळी असल्याचं बोललं जात आहे.

कोरोनाचं संकट डोक्यावर असतानाच आता नव्या एका आजाराने तोंड वर काढल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. दरम्यान, आता कोरोनानंतर म्युकरमायकोसिस या आजाराने राज्यभरात हाहाकार माजणार की काय? असा प्रश्न सर्वांना सतावत आहे.

थोडक्यात बातम्या –

“मी तुमच्या आईला पळवून नेलं”, भावांना चिडवणाऱ्या आईच्या प्रियकरासोबत त्यांनी केलं ‘हे’ कृत्य

“कोरोना रुग्णसंख्या वाढली की जनता बेजबाबदार, कमी झाली की सरकारचं यश”

टाॅमीला कुत्रा का म्हटलं?; कुत्र्याच्या नावावरून दोन कुटूंबात तुफान हाणामारी

कोरोनाचे नियम धाब्यावर, ‘या’ ठिकाणी मुस्लिम धर्मगुरुच्या अंत्ययात्रेसाठी तुफान गर्दी

पुण्यात लसीकरणाच्या नोंदणीत गोंधळ; तरूणांमध्ये संतापाचं वातावरण

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More