बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

जितेंद्र आव्हाडांच्या पाच कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

नाशिक |  गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या पाच कार्यकर्त्यांविरोधात नाशिक पोलिसांनी आपत्ती व्यवस्थापन कायद्याचं उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. नवशा गणपती मंदिरात आव्हाड यांना देवाच्या आरतीसाठी निमंत्रित करण्यात  आलं होतं. या आरतीच्यावेळी लोकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.

यामुळे कोरोना नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसांनी विश्वस्तांसह आव्हाडांच्या पाच कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केला आहे. नाशिक मधील गंगापूर पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी ही कारवाई केली आहे. पोलिसांच्या या कारवाईनंतर भाजपने आव्हाडांसह महाविकास आघाडीच्या सरकारवर निशाणा साधला आहे.

जितेंद्र आव्हाड यांना सरकार पाठिशी घालत आहे. आव्हाडांवर कारवाई करण्याऐवजी सरकार कार्यकर्त्यांचा बळी देत आहे, असा आरोप भाजपचे आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख आचार्य तुषार भोसले यांनी केला आहे. आव्हाडांच्या ज्या पाच कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यांना लवकरंच अटक करण्यात येईल, असं गंगापूर पोलिसांनी स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, आपत्ती व्यवस्थापन कायद्याचं उल्लंघन केल्याप्रकरणी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर देखील आज विटा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खानापूर तालुक्यातील बाणूरगड येथे 19 जुलै रोजी बहिर्जी नाईक यांच्या स्मारकाचा भूमीपूजन सोहळा कोरोनाचे नियम ढाब्यावर बसवत पार पाडण्यात आला. यामुळे पडळकरांवर गुन्हा दाखल केला गेला आहे.

थोडक्यात बातम्या – 

मुलगी 3 महिन्यांपासून बेपत्ता, पोलिसांची उडवाउडवीची उत्तरं; बापानं घेतला गळफास!

‘आधी आरक्षण द्या, मग आम्हाला शिकवा’; संजय राऊतांचा दानवेंवर पलटवार

बेडकाने कितीही फुगण्याचा प्रयत्न केला तरी बैल होत नाही- आशिष शेलार

…मग संजय राऊत राज्य सरकारवरही खटला भरणार आहेत का?- चित्रा वाघ

शार्लिन चोप्रा आणि राज कुंद्रामध्ये झाला होता ‘हा’ मोठा करार

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More