Uddhav Thackeray l राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी महाविकास आघाडीचे नेतेमंडळी सभा घेण्यावर जोर देत आहेत. अशातच उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी कोल्हापूरमध्ये 5 मोठी आश्वासने दिले आहेत. यामधील पहिलं आश्वासन म्हणजे राज्यातील विद्यार्थिनींना सरकारकडून मोफत शिक्षण दिले जाते. परंतु, आता राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आल्यावर राज्यातील मुलांना देखील मोफत शिक्षण दिले जाईल.
मुंबई मराठी माणसाची आहे :
याशिवाय दुसरं आश्वासन म्हणजे पोलीस स्टेशनमध्ये गेल्यावर महिलांना कुठे तक्रार करायची हे अनेकदा लक्षात येत नाही. मात्र या पार्श्वभूमीवर राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आल्यास महिला पोलिसांची भरती केली जाईल. तसेच पोलीस ते वरिष्ठ पदांवर महिला अधिकारी असलेले पोलीस ठाणे देखील सुरु करण्यात येईल.
तसेच तिसरं आश्वासन म्हणजे मुंबईतील अदानी प्रकल्प रद्द करुन त्याठिकाणी धारावीकरांना उद्योगधंद्यासकट घरे देण्याचं आश्वासन दिल आहे. तसेच ग्रामीण भागातील जनतेने मुंबईत यावे व मुंबई तुमची आहे, तर मुंबई ही मराठी माणसाची आहे असे शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी कोल्हापूरकरांना सांगितले आहे.
Uddhav Thackeray l आमची सत्ता पुन्हा आल्यावर शेतीमालाला हमीभाव देऊ :
चौथं आश्वासन म्हणजे राज्यातील शेतकऱ्यांना मविआची सत्ता आल्यास हमीभाव दिला जाईल. आमचं सरकार पडलं नसतं तर यंदाच्या वर्षी शेतकरी कर्जमुक्त झाला असता. पण आमची सत्ता पुन्हा आल्यावर शेतीमालाला हमीभाव देऊ अशी घोषणा उद्धव ठाकरे यांनी केली आहे.
तर पाचवं आश्वासन म्हणजे आमचे सरकार असताना पाच जीवनावश्यक वस्तूंचे भाव स्थिर होते. आता पुन्हा आमची सत्ता आली की महाराष्ट्रात पुढील पाच वर्षे जीवनावश्यक वस्तूंच्या दरात कोणतेही बदल होणार नाही. डाळ, तांदूळ, साखर, तेल अशा जीवनावश्यक वस्तूंचे भाव आमचे सरकार स्थिर ठेवेल असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे.
News Title : Five big game changer promises of Uddhav Thackeray in Kolhapur
महत्वाच्या बातम्या –
सिनेसृष्टीतील बडा नेता अजितदादांच्या भेटीला; चर्चांना उधाण
उद्धव ठाकरेंनी 5 नेत्यांची केली हकालपट्टी; ‘या’ नेत्यांचा समावेश
माजी खासदाराचा भाजपला रामराम; आता शिंदेंच्या उमेदवाराला देणार आव्हान
राज्यात कोणी कोणी उमेदवारी अर्ज मागे घेतले? पाहा संपूर्ण यादी एका क्लीकवर
गुड न्यूज! दिवाळी सरताच सोनं झालं स्वस्त; जाणून घ्या आजचे दर