पुणे | सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या इमारतीमध्ये लागलेल्या आगीत पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
कोरोना लस निर्मिती जिथं होते ती इमारत घटनास्थळापासून दूर आहे. त्यामुळं लसीला कुठलंही नुकसान नाही. ज्या ठिकाणी बीसीजी लस बनवली जाते त्या ठिकाणी आग लागली, असं राजेश टोपे यांनी सांगितलं आहे.
सीरम इन्स्टिट्यूटचा हा मांजरी भागातील नवीन प्लांट आहे. मी जिल्हाधिकाऱ्यांशी बोललो आहे, असं राजेश टोपे यांनी सांगितलं आहे.
बिल्डिंगचं काम सुरू होतं. वेल्डिंग स्पार्कमुळे ही आग लागली आणि वाढली. आता आग विझवण्यात आली आहे. आग आटोक्यात यायला 2 ते 3 तास वेळ लागला. आता आग आटोक्यात आली आहे, असं टोपेंनी सांगितलंय.
थोडक्यात बातम्या-
“अजित पवारांना मंत्र्यांना तंबी द्यावी लागत असेल, तर परिस्थिती गंभीर आहे”
सीरम इन्स्टिट्यूटमध्ये लागलेल्या आगीबाबत मुक्ता टिळक यांचं मोठं वक्तव्य, म्हणाल्या…
“पवार साहेबांचं कुटुंब मोठं आहे त्यामुळे मुख्यमंत्री होण्यासाठी पाटलांना…”
सोनू सूदला उच्च न्यायालयाचा मोठा झटका; कारवाई होण्याची शक्यता
दहावी, बारावीच्या परीक्षेची तारीख अखेर जाहीर, शिक्षणमंत्र्यांनी केली घोषणा