अहमदनगर | राज्य सरकारने कर्नाटकप्रमाणे दूध उत्पादकांना लिटरमागे 5 रुपये अनुदान द्यावे; अन्यथा आम्हाला रस्त्यावर उतरावे लागेल, असा इशारा खासदार राजू शेट्टी यांनी दिला आहे. नगरच्या शासकीय विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
राज्य सरकारने शेतकरी कर्जमाफीत गोंधळ घातला आहे. सरकारच्या दळभद्री धोरणामुळे दुधाचा प्रश्न सुटलेला नाही. ‘एफआरपी’प्रमाणे ऊसाची थकीत रक्कम मिळण्यासह दुधाच्या प्रश्नासंदर्भात शुक्रवारी पुण्याच्या साखर आयुक्त कार्यालयावर धडक मोर्चा नेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
सत्तेत येताना सरकारने हमीभावाचे आश्वासन दिले, मात्र त्याची अंमलबजावणी झाली नाही, असंही ते यावेळी म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या –
-शिवसेनेचं भुज’बळ’!!! भाजप उमेदवार चौथ्या क्रमांकावर फेकला गेला
-केंद्रात मंत्रिपद मिळाल्यामुळे मी खूश आहे आणि नाही पण!
-कबीर समाधीच्या दर्शनासाठी गेलेल्या योगींनी टोपी नाकारली
-“मुख्यमंत्र्यांच्या बायकोकडे वाकड्या नजरेनं बघितलं असतं, तर 2 दिवसात जामीन दिला असता का?”
-परक्यांना जवळ करताय?, आम्ही काही पक्ष बदलणारे लोक नाहीत!
Comments are closed.