बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

काळजाचा ठोका चुकवणारी घटना; देवरुखवाडीत दरड कोसळून पाच घर मातीच्या ढिगाऱ्याखाली

सातारा | साताऱ्यात काळजाचा ठोका चुकवणारी घडना घडली आहे. साताऱ्यात देवरुखवाडीयेथे मोठ्या प्रमाणात भूस्खलन झालं आहे. ढिगाऱ्याखाली काही नागरिक अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेची माहिती मिळताच एनडीआरएफची टीम साताऱ्यात दाखल झाली आहे. देवरूखवाडीवर दरड कोसळली असून पाच घरं मातीच्या ढिगाऱ्याखाली गेली. मात्र नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं आहे.

मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या 27 नागरिकांची सुटका रात्री करण्यात आलेली असून 2 महिला मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या आहेत. ढिगाऱ्याखालून सुटका केलेल्या नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आलं आहे.

अतिवृष्टीमुळे रेस्क्यू मोहीम थांबवण्यात आली होती. मात्र सकाळपासून पुन्हा एकदा रेस्क्यू ऑपरेशन सुरु करत बेपत्ता महिलांना शोधण्याचं काम सुरू आहे. तसेच पाटण तालुक्यातील मोरणा विभागात असणाऱ्या आंबेघर येथे दरड कोसळण्याची घटना घडली आहे. गुरुवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली असून आंबेघर येथील काही घरे या मातीच्या ढिगाऱ्याखाली गेली आहेत. या घटनेची माहिती समजताच काही ग्रामस्थ घटनास्थळी पोहोचले आहेत. मात्र त्याठिकाणी तीन कुटुंबातील लोक रात्रीपासून बेपत्ता असल्याचे सद्यस्थितीत समोर येत आहे.

दरम्यान, सातारा जिल्ह्यात गेल्या काही तासांपासून मुसळधार पाऊस पडत असून कोयना नदीपात्राजवळील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तर काही लोकांना सुरक्षित स्थळी देखील पोहचवण्यात आलं आहे.

थोडक्यात बातम्या- 

“लस काय झाडाला लागल्यात का? केंद्र सरकारने हव्या तितक्या तोडून द्यायला”

राज कुंद्राच्या अटकेनंतर शिल्पाची पहिली पोस्ट, म्हणाली….

तरूणीच्या विनयभंग प्रकरणी राष्ट्रवादीचा ‘हा’ मंत्री अडचणीत; ऑडिओ क्लिप व्हायरल

राज्य सरकारमुळे कोकणात पूरस्थिती- प्रवीण दरेकर

भारताला मिळू शकते आणखी एक लस; ‘या’ लसीला मंजुरी मिळण्याची शक्यता

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More