बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

राजेश टोपेंनी सांगितले टास्क फोर्सच्या बैठकीतील महत्वाचे मुद्दे; वाचा एका क्लिकवर

मुंबई | महाराष्ट्रात कोरोना रुग्णसंख्या वाढत असतानाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाऊनचे संकेत दिले आहेत. महाराष्ट्रात संपूर्ण कडक लॉकडाऊन करण्याबाबत चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी काल सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलावली होती. कालच्या बैठकीनंतर आज टास्क फोर्सची बैठक मुख्यमंत्र्यांनी विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी बोलावली.

आजच्या टास्क फोर्सच्या बैठकीमध्ये नेमक्या कोणत्या गोष्टींची चर्चा झाली याबाबत महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी माहिती दिली आहे. आजच्या बैठकीमध्ये नेमक्या कोणत्या गोष्टींवर चर्चा झाली त्या बैठकीतील 5 मुद्दे खालील प्रमाणे –

1. महाराष्ट्रात ऑक्सिजन उत्पादन वाढवण्यावर भर देण्यात येणार तसेच महाराष्ट्रात ऑक्सिजन जनरेशन प्लँट उभारण्याबद्दल चर्चा करण्यात आली.

2. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात लिक्विड ऑक्सिजन प्लँट टाकायचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे त्यामुळे ऑक्सिजनची साठवणूक करता येईल आणि दररोजची धावपळ होणार नाही.

3. रेमडेसिवीर इंजेक्शनचा अनावश्यक वापर करणार्‍यांवर कारवाई होणार, तसेच येत्या पंधरा दिवसात इंजेक्शनचा मोठा साठा उपलब्ध होणार. तसेच रेमडेसिवीर इंजेक्शन जिल्हाधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली खाजगी रुग्णालयांनाही देण्याचा निर्णय घेण्यात आला.

4. महाराष्ट्रातील लॉकडाऊनबाबतही चर्चा करण्यात आली. तसेच टास्क फोर्सच्या बहुतांश सदस्यांनी महाराष्ट्रात कडक लॉकडाऊन गरजेचा असल्याचं मत व्यक्त केलं आहे.

5. राज्यातील काही शहरांमध्ये व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजन बेडची कमतरता असल्याने 1 ते 2 दिवसात मुख्यमंत्री कॅबिनेट बैठक घेऊन चर्चा करून नंतर योग्य तो निर्णय घोषित करतील, असं आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं.

वरील पाच महत्त्वाच्या मुद्द्यांवर आजच्या टास्क फोर्सच्या बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली आहे. तसेच बैठक संपल्यानंतर केंद्र सरकारने रेमडेसिवीर इंजेक्शनची निर्यात बंदी केल्याने आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी माध्यमांशी बोलताना केंद्र सरकारचे आभारही व्यक्त केले आहेत. महाराष्ट्रात लॉकडाऊनबद्दल कोणत्याही क्षणी निर्णय होऊ शकतो, अशी परिस्थिती सध्या आहे. त्यामुळे मुख्यमंत्री नेमका काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

थोडक्यात बातम्या

वृद्धाची हत्या करुन गावाबाहेर नेऊन पुरलं, मात्र कुत्र्यांनी…

पुण्यात कोरोनाचा कहर सुरुच; आज दिवसभरात आढळले इतके रूग्ण!

राज्यात कोणत्याही क्षणी लागू शकतो लॉकडाऊन; ‘या’ 6 गोष्टींची काळजी घ्या!

रेमडेसिवीर इंजेक्शन वितरणासाठी नियंत्रण कक्ष सुरु; ‘या’ क्रमांकावर संपर्क करुन मिळवा इंजेक्शन

“अडवानी गांधीनगरचे खासदार होते म्हणून भाजपने 6 वेळा माझं तिकीट कापलं”

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More