बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

रासायनिक कंपनीतल्या आगीतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत

मुंबई | पुण्यातील हिंजवडीमधील उरवडे जवळील एसव्हीएस कंपनीला लागलेल्या आगीत 17 कर्मचाऱ्यांचा होरपळून मृत्यू झाला आहे. या दुर्दैवी घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना उपमुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मदत जाहीर केली आहे.

पुण्याच्या मुळशी तालुक्यातील उरवडे गावाजवळ रासायनिक कंपनीला लागलेल्या आगीत कामगारांचा मृत्यू झाल्याची घटना दुर्दैवी, क्लेशदायक आहे. अग्निशमन दलाने आग विझवण्यासाठी, बचावासाठी शर्थीचे प्रयत्न करूनही काहींना वाचवता आलं नाही, हे अधिक दु:खदायक आहे. दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांबद्दल सहानुभूती असून, मृतांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारकडून प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत देण्यात येईल, अशी घोषणा अजित पवार यांनी म्हटलं आहे.

आग विझली असली तरी कूलिंग ऑपरेशन सुरू आहे. ते पूर्ण झाल्यानंतर आगीचं प्राथमिक कारण कळू शकेल. मावळ प्रांताधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील तज्ज्ञांच्या समितीकडून आगीच्या कारणांची चौकशी करण्याचे आदेश पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी दिले असल्याची माहिती अजित पवारांनी दिली.

दरम्यान, चौकशीतून आगीची नेमकी कारणे कळतील आणि दुर्घटनेची जबाबदारी निश्चित करता येईल. या आगीची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दल आणि स्थानिक प्रशासन तात्काळ घटनास्थळी पोहोचलं होतं. जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीसप्रमुख, पीएमआरडीए आयुक्तांकडून यासंदर्भात अधिकची माहिती घेतल्यानंतर त्यांनाही तात्काळ दुर्घटनास्थळी पोहोचून आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत.

थोडक्यात बातम्या- 

मुंबईत दररोज हजारांच्या आत नव्या कोरोनाबाधितांची होतेय नोंद, कोरोनामुक्तीचा दर वाढला

माणुसकीला काळीमा फासणारी घटना! पैशाच्या लोभापाई सासऱ्याने सुनेला विकलं अन्…; अशा प्रकारे झाला उलगडा

अखेर बहुप्रतिक्षित आयपीएलचा मुहूर्त ठरला; ‘या’ तारखेपासून होणार उर्वरित सामने

कोरोनाचं हॉटस्पॉट ठरलेल्या ‘या’ शहरातील नव्या कोरोनाबाधितांची संख्या 150च्या खाली

आनंदाची बातमी! पुणेकरांचं कोरोना मुक्तीकडे पहिलं पाऊल, वाचा आजची दिलासादायक आकडेवारी

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More