Top News महाराष्ट्र मुंबई

भंडाऱ्यातील पीडित कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाखांची मदत- राजेश टोपे

मुंबई | भंडारा जिल्हा सरकारी रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांचा मृत्यू झाला आहे. या घटनेतील पीडित कुटुंबियांना मदत जाहीर करण्यात आली आहे.

राज्य सरकारकडून दुर्घटनेतील पिडीत कुटुंबाला मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत करण्यात येणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं आहे. एबीपी माझाशी ते बोलत होते.

या दुर्घटनेची सखोल चौकशी करण्यात येणार असून, यात कोणीही दोषी आढळल्यास त्यांच्यावर सक्त कारवाई करण्यात येणार असल्याचंही टोपेंनी सांगितंल.

दरम्यान, प्रगतीशील महाराष्ट्रात दहा नवजात बालकांचा मृत्यू आयसीयूमध्ये व्हावा यासारखी लाजिरवाणी परिस्थिती दुसरी नाही, असं म्हणत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी मृतांच्या नातेवाईकांना दहा लाखाची मदत द्यावी, अशी मागणी केली.

थोडक्यात बातम्या-

गुजरातचे माजी मुख्यमंत्री माधवसिंह सोलंकी यांचे निधन

…त्या दहा बालकांचा मृत्यू झाला नसून हत्या करण्यात आली आहे- राम शिंदे

“मुळात धरणवीर उपमुख्यमंत्र्यांच्या चौकशांना कोणीही भिक घालत नाही”

“महाराष्ट्राच्या इतिहासातील काळी घटना, मृतांच्या नातेवाईकांना 10 लाखाची मदत द्यावी”

मुंबईकरांसाठी अत्यंत धक्कादायक बातमी; 6 दिवसांपासून ‘या’ गोष्टीची गुणवत्ता घसरली!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या