बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोरोनामुळे एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू, दशक्रिया विधीचा पोस्टर पाहून महाराष्ट्र हळहळला

सिन्नर | कोरोनाच्या सुरूवातीच्या लाटेत शहरी भागात कोरोना मोठ्या प्रमाणात पसरला होता. मात्र दुसऱ्या लाटेत कोरोनाचा संसर्ग ग्रामीण भागातही वाढला आहे. कोरोना इतका भयंकर आहे की त्याने काही कुटुंबच्या कुटुंब संपवली आहेत. अशातच सिन्नर तालुक्यात नांदुर शिंगोटेमध्ये एकाच कुटुंबातील पाच जणांचं कोरोनाने निधन झालं होतं. त्यांचा आज सामुदायिक दशक्रिया विधीचा कार्यक्रम होता.

या कुटुंबामधील पाचही जणांचे फोटो सोशल माध्यमांवर व्हायरल झाले आहेत. नांदूरशिंगोटे येथील ज्येष्ठ शेतकरी बाबूराव शिवराम शेळके आणि त्यांची पत्नी लक्ष्मीबाई बाबूराव शेळके यांच्यासह त्यांचे पुत्र सुरेश बाबूराव शेळके, रमेश बाबूराव शेळके यांचा कोरोनाने मृत्यू झाला तर रमेश यांचा इंजिनिअर असलेला आणि पुण्यात नोकरीला असणारा 30 वर्षीय मुलगा सचिन याचाही कोरोनाने मृत्यु झाला आहे.

रमेश यांना तापासारखी लक्षणे जाणवू लागल्याने ते दापुर येथील बहिणीकडे मुक्कामी गेले होते. या बहिणीलाही कोरोनाचा संसर्ग झाला होता. शुक्रवारी उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला आहे. तर त्यांच्या पतीवरही नांदूर येथेच खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शेळके कुटुंबातील अजूनही दोघा-तिघांवरही उपचार सुरू आहेत. त्यामुळे सर्व गावावर शोककळा पसरली आहे.

दरम्यान, नांदुर शिंगोटेमध्ये गेल्या 15 दिवसात 20 ते 25 जणांचा कोरोनाने मृत्यु झाला आहे. याच तालुक्यातील दोडी बुद्रुक आणि निमगाव-सिन्नरसह इतर गावांमध्ये मुत्युचे आकडे दोन अंकी संख्या ओलांडून गेले आहेत. ग्रामीण भागातही कोरोना पसरतोय मग कोरोनाच्या तिसऱ्या संभाव्य लाटेत काय परिस्थिती होईल याचा विचार करा. त्यामुळे तशा प्रकारची अवस्था होऊन नसेल द्यायची तर प्रत्येकाने नियमांचं पालन करत कोरोनाच्या लढाईत सामील होत कोरोनावाहक बनू नका.

थोडक्यात बातम्या- 

सावधान! चक्रीवादळामुळे ‘या’ चार जिल्ह्यात पडणार मुसळधार पाऊस, ऑरेंज अलर्ट जाहीर

‘मतदारसंघातील कोरोनामुळे उद्ध्वस्त झालेल्या कुटुंबांना 50 हजार रुपये देणार’; ‘या’ नेत्याची घोषणा

कसा पसरतो ब्लॅक फंगस?, बचावासाठी काय कराल?, महत्त्वाची माहिती आली समोर

काँग्रेसच्या युवा नेत्याच्या अंत्यसंस्काराला हजारोंची गर्दी, पाहाल तर हैराण व्हाल

‘महाराष्ट्राची प्रगती पचत नाही म्हणून…’; ठाकरे सरकारमधील मंत्र्याचा फडणवीसांवर गंभीर आरोप

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More