बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी आणि भारतीय सैन्यात चकमक; जवानांकडून पाच अतिरेक्यांचा खात्मा

श्रीनगर | जम्मू काश्मीरमधील पुलवामा भागात दहशतवादी आणि भारतीय सैन्यात झालेल्या चकमकीत भारतीय जवानांनी पाच अतिरेक्यांचा खात्मा केला. घटनास्थळी भारतीय सैन्य, निमलष्करी दले, अग्निशमन दल आणि राज्य पोलीस कर्मचारी उपस्थित आहेत.

जम्मू-काश्मीरमधील कुलगाम आणि पुलवामा जिल्ह्यात सुरक्षा दलांशी झालेल्या तीन वेगवेगळ्या चकमकीत पाच दहशतवादी ठार झाल्याचं कळतंय. या भागात अतिरेक्यांच्या उपस्थितीची माहिती मिळताच सुरक्षा दलांनी कुलगाम जिल्ह्यातील झोदर भागात घेराव आणि शोधमोहीम सुरू केल्याची माहिती आहे.

काश्मीरमध्ये गेल्या 24 तासात 5 दहशतवादी ठार झाले आहे, अशी माहिती काश्मीर पोलीस आयजीपी विजय कुमार यांनी दिली आहे. सुरक्षा दलावर अतिरेक्यांनी गोळीबार केला तेव्हा शोधमोहीम चकमकीत बदलली. या चकमकीत लष्कर-ए-तैयबाचे दोन दहशतवादी ठार झाल्याचं कळतंय.

अद्याप सर्च ऑपरेशन सुरु आहे. पुचलमध्ये दहशतवादी लपून बसले असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर भारतीय सैन्यानं तात्काळ सर्च ऑपरेशन सुरु केलं, असं काश्मीर झोन पोलिसांनी सांगितलं आहे.

 

 

 

थोडक्यात बातम्या- 

नारायण राणेंना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळाल्यावर शिवसेनेचं आव्हान, म्हणाले…

‘बिघडलंय तर इंजिन आणि बदलले डबे’; मंत्रीमंडळाच्या विस्तारावर महाविकास आघाडीची टीका

‘आता कुणाला काय सीडी लावायची, ती लावावी’; भाजपचं थेट खडसेंना आव्हान

हिमाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांचं निधन!

एकनाथ खडसेंची प्रकृती बिघडली; आज होणारी पत्रकार परिषद रद्द

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More