“अजून पाच ते सहा दिग्गज नेते आणि त्यांची मुलं भाजपच्या वाटेवर”

जळगाव | काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे पाच ते सहा मोठे नेते आणि त्यांची मुलं देखील भाजपमध्ये येण्यासाठी आमच्या संपर्कात आहेत. अशी माहिती जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी जळगावमध्ये संपर्क कार्यालयात बोलताना दिली.

आता लोकांचा भाजपवर विश्वास वाढला असून सुशिक्षित पिढीचा देखील वाढता कल दिसून येत आहे, असंही गिरीश महाजन म्हणाले.

जळगाव मतदारसंघासाठी उमेदवार हा निवड समितीच्या माध्यमातून होणार आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसात भाजपची उमेदवारांची नावे जाहीर होतील, असं महाजन यावेळी म्हणाले.

दरम्यान, रावेर लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार रक्षाताई खडसे यांचं तिकीट कापलं जाणार असल्याची चर्चा आहे. त्यांच्या जागी गिरीश महाजन यांच्या पत्नीच्या नावाची चर्चा आहे.

महत्वाच्या बातम्या-

-महाराष्ट्रात प्रितम मुंडे आणि पूनम महाजनांचं नाव निश्चित?

-राज ठाकरेंनी कुठेही एक जागा लढावी आणि डिपॉझिट वाचवून दाखवावं- विनोद तावडे

-कतरिनाला सलमान खानने 65 लाखांची कार गिफ्ट केल्याची चर्चा!

तरुण दिसण्यासाठी मायावती फेशियल करतात- भाजप आमदार

-भाजप सत्तेत आल्यापासून एकही दंगल नाही- योगी आदित्यनाथ