Top News देश

धक्कादायक! लंडनमधून भारतात आलेल्या ‘त्या’ विमानात सापडले कोरोना पॉझिटिव्ह प्रवाशी

नवी दिल्ल | लंडनमधून भारतात येणाऱ्या विमानांना बंदी घालण्यात आली आहे, मात्र शेवटची काही विमानं भारतात येत आहेत. यातील एका विमानातून भारतासाठी धक्कादायक बातमी समोर आली आहे.

लंडनहून रात्री एक विमान नवी दिल्लीत दाखल झालं आहे. या विमानात ५ प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. नुकताच इंग्लंडमध्ये कोरोनाचा नवा प्रकार समोर आला आहे, त्यामुळे ही भारतसाठी चिंता वाढवणारी बातमी आहे.

लंडनहून दिल्लीत दाखल झालेल्या या विमानात २६६ प्रवाशी होते, त्यापैकी ५ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून संपर्कात आलेल्यांना क्वारंटाईन करण्यात आलं आहे.

दरम्यान, इंग्लंडमध्ये आढळलेला कोरोनाचा नवा विषाणू अधिक घातक आहे. आधीच्या कोरोनापेक्षा याचा फैलाव होण्याचा वेग ७० टक्के अधिक आहे.

थोडक्यात बातम्या-

‘तयार रहा… बिहारमध्ये पुढच्या वर्षीही निवडणुका होऊ शकतात’; तेजस्वी यादवांनी केला गौप्यस्फोट

“मोतीलाल वोरांचं आयुष्य हे जनसेवेचं आणि काँग्रेसच्या विचारांप्रती असलेल्या निष्ठेचं आर्दश उदाहरण”

देशात कोरोना साथीचा वाईट काळ सरल्याची चिन्हे- केंद्रीय आरोग्यमंत्री

…अशा देशात आता जगण्याची इच्छा राहिलेली नाही- अण्णा हजारे

“गद्दार राणेंना बाळासाहेबांचं नाव घेण्याचा अधिकार नाही”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या