बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

तरुणीवर सामूहिक बलात्कार करुन व्हिडीओ शूट करणाऱ्या पाच नराधमांना अटक!

बंगळुरु | तरुणीवर सामूहिक बलात्कार करुन मारहाण करत या कृत्याचे व्हिडीओ शूट करणाऱ्या पाच नराधमांना अटक करण्यात आली आहे. आसाम पोलिसांनी व्हायरल व्हिडीओतून आरोपींचे फोटो जारी केल्यानंतर बंगळुरुत पाच जणांना अटक केलीये.

पीडिता आणि आरोपी बांगलादेशी नागरिक असल्याचं तपासादरम्यान समोर आलं आहे. सर्व एकाच ग्रुपचे सदस्य होते. मात्र पैशांच्या कारणावरुन भांडणं झाली. त्यानंतर आरोपींनी महिलेचे शारीरिक शोषण केलं. मानवी तस्करीसाठी पीडित महिलेला बांगलादेशहून भारतात आणल्याची माहिती आहे. अटक झालेल्या पाच आरोपींमध्ये एका महिलेचाही समावेश आहे. एका महिलेचे शारीरिक शोषण करणाऱ्या पाच जणांना व्हिडीओ क्लीपच्या आधारे अटक केली, अशी माहिती बंगळुरु पोलिसांनी दिली.

राममूर्ती नगर पोलिसांच्या माहितीनुसार हा व्हिडीओ जवळपास 10 दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता. यातील आरोपी एका आंतरराष्ट्रीय मानवी तस्करी रॅकेटमध्येही सहभागी असल्याचा पोलिसांचा दावा आहे.

दरम्यान, गुरुवारी दिवसभर सोशल मीडिया आणि सर्व बातम्यांमध्येही एका व्हिडीओ ची चर्चा होती. माणुसकीला काळीमा फासणारा प्रकार उघड झाला. एका महिलेवर गँग रेप होत असतानाचा तो व्हिडीओ होता. सुरुवातीला तो जोधपूरचा असल्याचं सांगितलं गेलं, पण केंद्रीय मंत्री किरण रिजीजू यांनी या घृणास्पद प्रकाराची दखल घेत तातडीने सर्व राज्यांच्या पोलिसांनी हे कुठलं प्रकरण आहे याची शहानिशा करायला सांगितलं.

 

 

 

थोडक्यात बातम्या- 

भारतात कोरोनामुळे 42 लाख मृत्यू झाल्याचा न्यूयॉर्क टाइम्सचा दावा केंद्रानं फेटाळला!

लसीकरण करताना दोन वेगवेगळ्या कंपनीचे डोस घ्यावेत का?; डाॅक्टरांनी दिला ‘हा’ सल्ला

मनसे आणि शिवसेनेचे कार्यकर्ते भिडले; तुफान हाणामारीत मनसे नेते प्रविण मर्गज जखमी

गणेश नाईकांनी सांगितला कोरोनावरील प्रभावी उपाय, म्हणाले…

ब्लॅक फंगसनंतर आता या नवीन बुरशीजन्य आजाराचा धोका; 8 रुग्ण सापडल्यानं खळबळ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More