बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘या’ ठिकाणी मुसळधार पावसानं घर कोसळून पाच जण ठार

बंगळुरु | गेल्या आठवड्याभरापासून मुसळधार पावसानं थैमान घातलं आहे. अनेक ठिकाणी पावसामुळे नुकसान झालेलं पहायला मिळालं. संपूर्ण जनजीवन विस्कळीत झालं आहे. अशातच आता मुसळधार पावसामुळे बेळगावमधील घर कोसळल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.

मुसळधार पावसामुळे बेळगाव तालुक्यातील बडाल अंकलगी गावात घर कोसळून पाच जण ठार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत तीन जण जखमी असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं आहे. त्यामुळे आता या गावात मदतकार्य पोहचवण्याचं काम सुरु आहे.

आठवड्याभरापासून राज्यभरात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी दरडही कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. कोरोनामुळे आलेल्या संकटातून सावरत असताना पावसानं थैमान मांडलं आहे.

दरम्यान, अंबरनाथमध्येही मुसळधार पावसामुळे उद्यानाची भिंत कोसळल्यानं 2 जणांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. महालक्ष्मी नगर गॅस गोडाऊन परिसरातली ही घटना आहे. भिंत कोसळल्याने 5 ते 6 घरांचं मोठं नुकसान झाल्याची माहिती आहे.

थोडक्यात बातम्या – 

अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा; सरकारकडून मदत जाहीर

#IPL2021 अटीतटीच्या सामन्यात हैदराबादचा बंगळुरूवर ‘रॉयल’ विजय

“11 ऑक्टोबरला महाविकास आघाडीने बंद पुकारलाय, लाज वाटली पाहिजे ठाकरे सरकारला”

‘जात साली जात साली जाता जाता जात नाय’; अवधूत गुप्तेंचं गाणं वर्षभराने व्हायरल

राज्याच्या कोरोना आकडेवारीत चढ-उतार, वाचा आजची ताजी आकडेवारी

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More