बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी ‘हे’ पाच महारथी आघाडीवर, जाणून घ्या!

नवी दिल्ली | भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांचा प्रशिक्षणपदाचा कार्यकाळ संपत आला आहे. आंतरराष्ट्रीय टी-20 विश्वचषकानंतर रवी शास्त्री मुख्य प्रशिक्षक पद सोडणार आहे. त्यामुळे बीसीसीआय भारतीय क्रिकेट संघासाठी नवा प्रशिक्षक शोधत आहे. त्यासाठी भारतीय तसेच परदेशी दिग्गजाची नावांची चर्चा सध्या चालू आहे.

प्रशिक्षक पदाच्या शर्यतीमध्ये भारताचा माजी मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळे याचं नाव सर्वात वरच्या क्रमांकावर आहे. 2016 साली कुंबळे भारतीय संघाचा प्रशिक्षक होता. परंतु विराट कोहली आणि कुंबळे यांच्यात वाद झाल्याने कुंबळे पदावरून पायउतार झाला. त्यानंतर भारताचा दिग्गज कसोटीपटू लक्ष्मण हा देखील या शर्यतीत आहे. तो सध्या आयपीएलमधील सनरायजर्स हैद्राबाद संघाचा मेन्टॉर आहे.

श्रीलंकेचा महान खेळाडू माहेला जयवर्धने या खेळाडूचं देखील नाव भारताच्या प्रशिक्षक पदाच्या शर्यतीत आहे. सर्व भारतीय माजी क्रिकेटपटूंच्या शर्यतीत एकमेव नाव फक्त महेला जयवर्धनाचा नाव आहे. महिला जयवर्धने सध्या आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघाचा प्रशिक्षक म्हणून काम करतो.

दरम्यान, तसेच भारताचा धडाकेबाज फलंदाज वीरेंद्र सेहवाग हा देखील या पदासाठी अर्ज दाखल करू शकतो अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्याच बरोबर दोन कसोटी आणि 4 एकदिवसीय सामने खेळणारे भारताचे माजी खेळाडू लालाचंद राजपूत याचं नाव सध्या चर्चेत आहे.

थोडक्यात बातम्या-

नोबेल पुरस्कार विजेते कैलाश सत्यार्थींनी अफगाण मुलींबाबत केलं मोठं वक्तव्य; म्हणाले…

धक्कादायक! महिलेच्या गळ्यात अडकली कोरोना चाचणीच्या कीटमधील कांडी, त्यानंतर….

कोरोना अपडेट! मुंबईच्या आकडेवारीत कमी अधिक प्रमाणात वाढ, वाचा आजची आकडेवारी

सोनाली नवांगुळ आणि मंजुषा कुलकर्णी यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर

‘संजय राऊतांच्या अंगात आलं अन् राज्यात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More