हा पराभव एकट्या पंतप्रधानांचाच- उद्धव ठाकरे

उद्धव ठाकरे

मुंबई |5 राज्यात झालेला भाजपचा पराभव हा एकट्या पंतप्रधानांचा आहे, अशी कडवट टीका सामना संपादकीयातून नरेंद्र मोदींवर करण्यात आली आहे.

मोदी जर प्रचारात उतरले नसते तर पराभवाचा दोष स्थानिक नेतृत्वाचा व तिकीट वाटपाच्या घोळाचा ठरला असता. मात्र, ते पूर्ण फोजफाटा घेऊन प्रचारात उतरले होते, त्यामुळे पराभवाला तेच कारणीभूत आहेत, अशी बोचरी टीका त्यात करण्यात आली आहे.

श्री राहुल गांधी यांनी विजय नम्रपणे स्वीकारला. पण, नरेद्र मोदी जवाहरलाल नेहरु, इंदिरा गाधी आणि राजीव गांधी यांचे देश उभारणीतील योगदान मानायलाच तयार नाहीत, अशी टीका संपादकीयातून करण्यात आली आहे.

दरम्यान, भाजप उभारणीतले लालकृष्ण अडवाणी व इतर कुणीच त्यांना मान्य नाहीत, असं त्यात म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या 

-शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठा निर्णय होणार?; सपाटून मार खाल्ल्यानंतर मोदींचा कमबॅक फॉर्म्युला

-भावुक झाले शिवराज सिंह; म्हणाले काही चूक झाली असेल तर माफ करा

-पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पराभव झाल्यामुळं ढसाढसा रडतो हा मुलगा

-भाजपाच्या शेवटाची सुरुवात झाली आहे- छगन भुजबळ

-मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसचं ‘कमल’ फुलणार; कमलनाथांच्या नावावर शिक्कामोर्तब?

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या