भाजपला दणके बसताच मोदी हादरले; निवासस्थानी बोलावली तातडीची बैठक

नवी दिल्ली | पाच राज्यांच्या निवडणूक निकालांमध्ये भाजपला मोठा धक्का बसला आहे. 3 राज्यांमध्ये भाजपची सत्ता जाणार असल्याचं चित्र आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या निकालाची गांभीर्याने दखल घेतली आहे. त्यांनी भाजपच्या कोअर कमिटीची आपल्या निवासस्थानी बैठक बोलावली आहे.

राजस्थानमध्ये काँग्रेसने जोरदार मुसंडी मारली आहे. वसुंधरा राजे यांना सत्तेवरुन खाली खेचण्यात काँग्रेसला यश आलं आहे. 

दुसरीकडे शिवराज सिंहांचा गडही ढासळल्याचं दिसत आहे. चिंताग्रस्त झालेल्या मोदींनी त्यामुळेच निवासस्थानी बैठक बोलावल्याचं कळतंय.

महत्वाच्या बातम्या –

मिझोरमनं ‘हात’ झटकला; काँग्रेस सत्तेवरुन पायउतार होणार?

धनुष्यबाणाचं बटन दाबलं, मत कमळाला गेलं; गोटेंची निवडणूक आयोगाकडे तक्रार

मोदींना आणखी एक धक्का; पंतप्रधानांचे आर्थिक सल्लागार डॉ. सुरजीत भल्लांचा राजीनामा

-भाजपची नौका बुडत असल्याचं दिसताच शेअर बाजाराला पुन्हा मोठे हादरे

-भाजपला सर्वात मोठा धक्का; 3 राज्यांमध्ये सत्ता जाण्याची शक्यता