बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘या’ पाच गोष्टी ठरल्या भारताच्या पराभवासाठी कारणीभूत

नवी दिल्ली | आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर झाल्यापासूनच क्रिकेट प्रेमींचं लक्ष लागलं होतं ते भारत विरूद्ध पाकिस्तान सामन्याकडे. सगळ्यांचेच लक्ष लागलेला भारत विरूद्ध पाकिस्तान हा रंजक सामना काल पार पडला. भारत यंदाही मौका साधणार असं प्रत्येक भारतीयाला वाटत होतं. पण पाकिस्तानने भारताचा पराभव करत विजय आपल्या नावाने करून घेतला.

पण भारतीय संघात सगळे चांगले खेळाडू असतानाही भारतीय संघाचा पराभव कसा झाला? हा प्रश्न आता उपस्थित होत आहे. भारताने पाकिस्तानसमोर उभं केलेलं 151 धावांचं लक्ष्य पाकिस्तानी खेळाडूंनी 17 षटकांतच पूर्ण केलं. भारताने नाणेफेक गमावली आणि हेच भारताच्या पराभवाचं मोठं कारण ठरलं. नाणेफेकीचा कौल भारतीय संघाच्या विरोधात गेला आणि अर्धा सामना तेव्हाच हाताबाहेर गेला.

भारताची फलंदाजी हे पराभवाचं दुसरं कारण ठरू शकतं. कारण पहिल्या सहा षटकातच भारताने महत्वाच्या तीन विकेट्स गमावल्या. विराट कोहली वगळता कोणत्याच फलंदाजाने चांगली कामगिरी केली नाही. फलंदाजासह भारतीय गोलंदाजही या सामन्यात सपशेल फेल ठरले. 152 धावा वाचवताना गोलंदाज विकेट काढण्यात असमर्थ ठरले आणि पाकिस्तानच्या सलामीवीरांनी सामना एकहाती जिंकला.

152 धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानच्या बाबर-रिझवान या जोडीनं पहिल्या चेंडूपासूनच आपलं वर्चस्व राखलं. अगदी मौक्याला विराट कोहलीची विकेट पडली, शेवटच्या काही षटकात तुफान फटकेबाजीची गरज असताना हार्दिक पांड्या, जडेजालाही यश आलं नाही. एकंदर फलंदाजी आणि गोलंदाजीसह या काही गोष्टी भारतीय संघाच्या कालच्या पराभवासाठी कारणीभूत असू शकतात.

थोडक्यात बातम्या-

सोनं खरेदी करणाऱ्यांना दिलासा; दिवाळीत सोनं मिळणार स्वस्तात!

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सणासुदी आधीच केंद्राकडून अलर्ट जारी

…अन् सगळेच भारतीय खेळाडू बसले गुडघ्यावर! कारण वाचून तुम्हालाही वाटेल अभिमान

अनन्या पांडे हाजिर हो!, ड्रग्ज प्रकरणात अनन्या पांडेच्या अडचणी संपता संपेना

आधी डेटिंगची अफवा, नंतर ऋषभ पंतकडून व्हॉट्सअ‍ॅपवर ब्लॉक, आता पंतसाठी उर्वशी थेट दुबईत स्टेडियमवर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More