पुणे | राज्यात सध्या आरोप-प्रत्यारोपांनी राजकीय वर्तुळातील वातावरण टाईट करुन टाकलं आहे. अशातच पुण्यात ‘भाजप : काल आज आणि उद्या’ पुस्तक प्रकाशन सोहळा पार पडला. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)यांच्या हस्ते या पुस्तकाचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटीलही (Chandrakant Patil) उपस्थित होते.
भाजप ही काही 1951 साली स्थापन झालेला पक्ष नसून त्याला पाच हजार वर्षांचा हिंदुत्त्वाचा इतिहास असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी यावेली म्हटलं. हा पक्ष 80 साली स्थापन झाला असे समजणारे खूप महाभाग आहेत ज्यांना टीव्हीवर रोज कव्हरेज मिळते, असंही पाटील म्हणाले.
ज्यांना आम्ही पार्टी मोठी केली, गावोगावी नेली, आमच्यामुळे पार्टी मोठी झाली असं वाटण्याच्या स्थितीत हे पुस्तक प्रकाशित होतं आहे. त्यांना इतिहास माहिती नाही असं नाही. पण एक नवीन सिस्टीम तयार झालीय. एकाने सकाळी खोटं बोललं की मग दिवसभर त्याने तेच बोलायचं त्याला इकोसिस्टीम म्हणतात. मग ही इकोसिस्टीम अशी चालते की ते खोटं खरं वाटू लागतं, असा टोलाही चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे.
दरम्यान, अनेकांनी हिंदुत्वाची शाल पांघरली आहे. पण, भाजपने अशी कुठलीही शाल पांघरलेली नाही. आमचं खरं हिंदुत्व आहे, असंही यावेळी देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं आहे.
थोडक्यात बातम्या –
“मंत्री धनंजय मुंडे म्हणजे राष्ट्रवादीची बॉबी डार्लिंग”
धनंजय मुंडेंकडून राज ठाकरेंचा अर्धवटराव म्हणून उल्लेख, म्हणाले…
मोठी बातमी! गुणरत्न सदावर्तेंबाबत सरकारी वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
“पक्षप्रमुख आदेश देतील आणि ईट का जवाब पत्थरसे दिया जायेगा”
महाराष्ट्रात पुन्हा मास्कसक्ती?, केंद्राने राज्यांना दिल्या ‘या’ सूचना
Comments are closed.