बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘मलिकांना मिरच्या का झोंबल्यात?…’ नवाब मलिकांच्या आरोपावर फ्लेचर पटेलांचं प्रत्युत्तर

मुंबई | सिनेअभिनेता शाहरूख खान याच्या मुलाला एनसीबीने अटक केल्यानंतर राज्यातील राजकारण तापू लागलं. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी एनसीबीवर गंभीर आरोप केले होते. त्यानंतर नवाब मलिकांनी एनसीबीचे क्षेत्रिय संचालक समीर वानखेडे आणि फ्लेचर पटेल यांच्यावर निशाणा साधला होता. फ्लेचर पटेल कोण आहेत?, असा सवाल मलिकांनी उपस्थित केला होता. त्यावर आता फ्लेचर पटेल यांनी नवाब मलिकांना प्रत्युत्तर दिलं आहे.

मी माझं काम करत आहे. मी सैन्यात होतो. मी 15 वर्ष देशसेवा केली होती. मी ड्रग्जविरोधात लढा देण्याचं काम करतोय. मी नवाब मलिकांना ओळखत नाही, मग मी त्यांच्या ,प्रश्नाची उत्तरं का देऊ?, असं फ्लेचर पटेल यांनी म्हटलं आहे. आम्ही एनसीबीचे योद्धे झालो तर नवाब मलिकांना का मिरच्या झोंबल्या?हे नवाब फडणवीस आणि दरेकरांनी सांगितलं आहे, असंही ते यावेळी म्हणाले.

मी टँक विभागात कामाला होतो. नवाब मलिकांनी माझ्यावर लावलेले पुर्ण आरोप खोटे आहेत. मी भारतीय सेनेचा आहे, याचा मला अभिमान आहे. मी निवृत्त झालो असलो तरी माझी सेवा आणखी संपली नाही. मी समीर वानखेडे यांची बहिण जसमीन वानखेडेला माझी मानलेली बहिण मानतो. ती एक क्राईम वकिल आहे. त्यामुळे नवाब मलिकांना चांगलं काम केलेलं दिसत नाही, अशी टीका देखील फ्लेचर पटेलांनी केली आहे.

दरम्यान, माझ्यावर जे आरोप करण्यात आले आहेत. ते मला मान्य नाही. त्यामुळे मी एनसीबीबरोबर माझं काम करत राहणार असल्याचं देखील फ्लेचर पटेलांनी सांगितलं आहे.

थोडक्यात बातम्या-

अमिताभ बच्चन यांच्या पत्नीची भुमिका निभावलेल्या ‘या’ अभिनेत्रीचं निधन

“वाटलं तर तुम्ही जो बायडन यांनाही प्रचाराला आणा, शिवसेना घाबरत नाही”

टीम इंडीयाचा नवीन कोच ठरला, ‘या’ खेळाडूने स्विकारली जबाबदारी

‘वसुली सरकार भरती काढत नाही आणि काढली तर सावळा गोंधळ घालतं’; पडळकरांचा राज्य सरकारवर हल्लाबोल

शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरणप्रसंगी मिरवणूक काढल्याने माजी मंत्र्यांवर गुन्हा दाखल

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More