बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

काबूल विमानतळाबाहेर चकमक; अमेरिकन सैन्याकडून चोख प्रत्युत्तर

काबूल | अफगाणिस्तानमधील नागरिकांची स्थिती दिवसेंदिवस चिंताजनक होताना दिसत आहे. देशातून बाहेर जाण्यासाठी विमानतळावर लोकांची प्रचंड गर्दी होताना दिसत आहे. सध्या काबूल विमानतळ अमेरिकन सैनिक ताब्यात आहे. कालच इसीस या दहशतवादी संघटनेकडून विमानतळावर आत्मघाती हल्ला केला होता. त्यानंतर आता काबूलच्या विमानतळाजवळील गेटवर हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे.

इसीस या दहशतवादी संघटनेकडून आत्मघाती हल्ल्या केल्यानंतर पुन्हा एकदा काबूल विमानतळावर गोळीबार झाला आहे. त्यावर अमेरिकन सैन्याकडूनही जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलं. त्यामुळे विमानतळाबाहेर प्रतिक्षेत असलेल्या अफगाणी लोकांनामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

अफगाणिस्तानवर तालिबानने कब्जा केल्यानंतर देशात दहशतवादी कारवाया सुरू झाल्या आहेत. इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेकडून केलेल्या आत्मघाती बॉम्बस्फोट हल्ल्यात जवळपास 169 जणांचा मृत्यू झाला होता. यामध्ये दोन पत्रकारांचाही समावेश असल्याचं सांगितलं जात आहे. तसेच त्यामध्ये 13 अमेरिकन सैनिकांचाही समावेश होता.

दरम्यान, काबूल विमातळाच्या गेटवर झालेल्या गोळीबारानंतर नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे. त्यामुळे त्याठिकाणी लोकांनाचा मोठा गोंधळ उडाला होता. उडालेल्या गोंधळात लोकांची चेंगराचेंगरी देखील झाल्याची माहिती समोर येत आहे.

पाहा व्हिडीओ-

 

 

थोडक्यात बातम्या-

आता स्वस्त किंमतीत सोन्यात गुंतवणूक करा; केंद्र सरकारची मोठी योजना

तिसऱ्या कसोटीत भारताचा दारूण पराभव; इंग्लंडच्या भेदक गोलंदाजीपुढे भारतीय फलंदाज ढेर

‘…अन्यथा गंभीर परिणाम भोगावे लागतील’; तालिबानचं अफगाणी नागरिकांना नवं फर्मान

जिथं दिसेल तिथं संजय राऊतांचा करेक्ट कार्यक्रम करू – निलेश राणे

राजनाथ सिंह यांनी शिवाजी महाराजांवर केलेल्या ‘त्या’ वक्तव्याचा अमोल कोल्हेंनी घेतला समाचार

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More