मुंबई | सध्या ऑनलाईन बाजारात वेगाने पुढे जात असलेल्या फ्लिपकार्ट या स्वदेशी कंपनीसोबत महाराष्ट्र सरकारने सामंजस्य करार केला आहे. या करारानुसार सरकारच्या ‘व्होकल फॉर लोकल’ या उद्घोषणेला चालना मिळणार आहे. कोरोनाच्या संकटातून हस्तकला आणि हातमाग उद्योगाला उभारी देण्यासाठी आम्ही हे क्रांतिकारी पाऊल उचलल्याचं उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी सांगितलं आहे.
फ्लिपकार्टने महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळ मर्यादित आणि महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ यांच्याबरोबर सामंजस्य करार केला असून त्या मार्फत छोट्या व्यावसायिकांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केला आहे. याच फ्लिपकार्ट समर्थ उपक्रमाच्या करारावर महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई आणि उद्योग राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी सही करून हिरवा कंदील दाखवला आहे.
फ्लिपकार्ट समर्थ हा राष्ट्रीय पातळीवर असलेला उपक्रम असून त्याची सुरुवात 2019 मध्ये झाली होती. त्या मार्फत स्वदेशी खादी कपडे, हस्तकलेच्या वस्तू, कागदी पर्स, कागदी वस्तू, दागिने, लाकडी खेळणी, पैठणी साड्या तसेच इतर बऱ्याच वस्तू देशातील करोडो लोकांसमोर मांडता येतील आणि देशातील वेगवेगळ्या भागातील ग्राहकांना आकर्षित करून आपल्या वस्तूंची विक्री करता येईल, हा त्यामागचा मुळ उद्देश आहे. जवळपास देशातील 7,50,000 हून अधिक व्यावसायिक या उपक्रमात जोडले गेले आहेत आणि त्याद्वारे रोजगार मिळवत आहेत.
याप्रसंगी बोलताना, आदिती तटकरे यांनी या करारामुळे ग्रामोद्योग, हस्तकला, हातमाग उद्योग क्षेत्राला चालना मिळून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होईल, असा विश्वास व्यक्त केला. तसेच, फ्लिपकार्टचे चीफ कॉर्पोरेट अफेअर्स ऑफिसर रजनीश कुमार यांनीही फ्लिपकार्ट समर्थ हा एक महत्त्वाचा उपक्रम असून त्यामार्फत आम्ही देशभरातील अधिकाधिक छोट्या व्यावसायिकांना फायदा करून देण्याचा प्रयत्न करत आहोेत आणि महाराष्ट्रात ही संधी मिळाल्यामुळे आम्ही जोमाने काम करण्यास इच्छुक असल्याचं बोलून दाखवलं आहे.
थोडक्यात बातम्या-
सचिनच्या मुलाचं काय होणार?; आज होणार महत्त्वाचा फैसला
‘या’ गावात सरपंच झाला की माणूस मरतोच म्हणायचे; महिलेनं घेतला धाडसी निर्णय!
शिवजयंतीची नियमावली जाहीर; ‘या’ नियमांचं पालन करावं लागणार!
पोलिसांची धडक कारवाई, 10 दरोडेखोरांच्या मुसक्या आवळल्या!
गोल्डनमॅन सचिन शिंदे हत्या प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई