बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘गंगा नदीत तरंगणारे मृतदेह हे….’; कंगणा राणावतचा जावईशोध

मुंबई | आपल्या बेताल वक्तव्यांमुळे कायम चर्चेत असलेली बॉलिवुडची प्रसिद्ध अभिनेत्री कंगणा राणावतने पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. काही दिवसांपुर्वी उत्तर प्रदेशमधील गंगा नदीत कोरोना बाधित रूग्णांचे मृतदेह तरंगताना सापडले होते. यावरून उत्तर प्रदेश सरकारवर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. अशातच अभिनेत्री कंगणा राणावतने जावईशोध लाव अजब दावा केला आहे.

गंगेत वाहून येत असलेले मृतदेह हे भारतातील नसून ते नायजेरियाचे असल्याचं कंगणा राणावतने म्हटलं आहे. ट्विटरवर बॅन केल्यानंतर कंगणा इन्स्टाग्रामवर सक्रीय झालेली पाहायला मिळत आहे.  जे फोटो व्हायरल झाले, ते गंगा नदीचे असल्याचं सांगितलं जातं. मात्र, ते फोटो गंगेचे नसून नायजेरियाचे आहेत. अशा फोटोंचा आपण विरोध करायचा नाही का?, असा सवाल कंगणाने केला आहे.

सर्वांनी एकत्र राहून कोरोनाविरुद्धची लढाई लढण्याचं आवाहनही केलं आहे. तिने इन्स्टावर एक व्हिडीओ शेअर केला असून त्यातून तिने हे आवाहन केलं आहे. इस्रायलप्रमाणे प्रत्येक विद्यार्थाला आर्मीत सेवा देणं बंधनकारक करावं. आम्हीही करू. तसेच आपल्याच धर्माचे लोक आपले आहेत, असं ज्याही धर्मात म्हटलं आहे. त्यांची पुस्तके हटवण्यात यावीत, अशी मागणीही कंगणाने केली आहे.

दरम्यान, तुम्ही हिंदू असो की मुसलमान. शीख असो की ख्रिश्चन असो, आपल्या सर्वांचा एकच धर्म असावा. तो म्हणजे भारतीयता. तुमच्याकडे माणुसकी असायला हवी. आपण एकमेकांची कदर केली तर सर्व मिळून पुढे जाऊ, असंही कंगणा म्हणाली.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Kangana Ranaut (@kanganaranaut)

थोडक्यात बातम्या-

‘इथं दिसना, तिथं दिसना’; कोविड सेंटर पेशंट मुक्त झाल्यानं कर्मचारी मनसोक्त नाचला

17 दिवसांपूर्वी झालं होतं लग्न; कोरोनाने उद्ध्वस्त केला नवदाम्पत्याचा संसार

“जो कहता था गंगा ने बुलाया है, उसने माँ गंगा को रुलाया है”

देवेंद्र फडणवीस यांचं सोनिया गांधींना पत्र, म्हणाले ‘ये पब्लिक है ना’

ममता बॅनर्जी यांचे छोटे बंधू असीम बॅनर्जी यांचा कोरोनाने मृत्यू

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More