बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोल्हापूर जिल्ह्याला महापूराचा धोका?; पंचगंगा नदीने ओलांडली धोक्याची पातळी

कोल्हापूर | गेल्या काही दिवसात पावसाचा जोर वाढल्यानं महाराष्ट्रात आता अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. कोकणासह मध्य महाराष्ट्रात देखील अतिवृष्टी झाल्यानं अनेक नद्यांना पूर आला आहे. आता शुक्रवारी देखील येथे पावसाचा जोर कायम राहणार आहे. भारतीय हवामान शास्त्र विभागानं दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी देखील कोकण आणि मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.

कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात अतिवृष्टी झाल्यानं आता अनेक नद्यांना पूर आला आहे. त्यामुळे आता कोल्हापूर जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर पंचगंगा नदीने देखील धोक्याची पातळी ओलांडली आहे. कोल्हापूरातील गगनबावडा तालुक्यात गेल्या 24 तासांत 226 मि. मी. पाऊस झाला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील 111 बंधारे पाण्याखाली गेली असून चार महामार्ग बंद करण्यात आले आहेत. तर तब्बल 15 वर्षानंतर रंकाळा तलाव पुन्हा ओसंडून वाहिला आहे.

शाहूवाडी, पन्हाळा, करवीर, राधानगरी, भुदरगड या तालुक्यात अतिवृष्टी झाल्यानं आता कोल्हापूरला महापूराचा धोका वाढत चालला आहे. कोल्हापूरात काही जिल्ह्यात पूरजन्य परिस्थिती निर्माण झाल्यानं नदीकाठच्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. तर महाबळेश्वर तालुक्यातील पूल पाण्याखाली गेल्यानं आता काही गावांचा संपर्क तुटला आहे. तर आंबा घाट खचल्यामुळे आंबा येथे कोल्हापूर रत्नागिरी महामार्ग बंद करण्यात आला आहे.

दरम्यान, कोल्हापुरातील अतिवृष्टी आणि संभाव्य पूर परिस्थितीबाबत पालकमंत्री सतेज पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये प्रशासनातील प्रमुख अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली आहे. यावेळी, जिल्ह्यातील पावसाचे, पूरपरिस्थितीचा आणि प्रशासनाकडून करण्यात येणाऱ्या उपाययोजनांबाबत आढावा घेतला. जिल्ह्यातील पुरबाधित नागरिकांचे आणि जनावरांचे स्थलांतरण करून त्यांना युद्धपातळीवर मदत पोहचवण्याचे आदेश देखील त्यांनी दिले आहेत.

थोडक्यात बातम्या-

मुंबईत आज अवघ्या ‘इतक्या’ नव्या कोरोनाबाधितांची नोंद, वाचा आकडेवारी

‘केंद्र सरकार राज्याला सर्वतोपरी मदत करेल’; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मुख्यमंत्र्यांना फोन

आसिफ खान आणि रसिका आडगावकारचा विवाहसोहळा धुमधडाक्यात संपन्न

‘गरज भासल्यास अमित शहांसोबत बोलणार’; कोकणातील पूर परिस्थितीवर नारायण राणेंची प्रतिक्रिया 

आनंदाची बातमी! राज्याचा रिकव्हरी रेट 96 टक्क्यांवर, वाचा आजची आकडेवारी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More