बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

भारताची विजयी सलामी; वेस्ट इंडिजवर 4 गडी राखून विजय

फ्लोरिडा | वेस्ट इंडिज विरुद्धच्या पहिल्या टी- ट्वेन्टी सामन्यात भारताने 4 गडी राखून विजय मिळवला. या विजयासह भारताने 3 सामन्याच्या टी- ट्वेन्टी मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.

भारतीय गोलंदाजांच्या माऱ्यासमोर वेस्ट इंडिजचा संघ 95 धावा करु शकला. वेस्ट इंडिजने दिलेल्या 96 धावांचा पाठलाग करताना भारताची सुरवात खराब झाली. मात्र भारताने 6 गडी गमावत विजय मिळवला.

भारताकडून सर्वाधिक 22 धावा रोहित शर्माने केल्या. नवदीप सैनीने सर्वाधिक 3 बळी, भुवनेश्वर कुमारने 2 बळी तर खलिल अहमद, कृणाल पांड्या आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी प्रत्येकी 1-1 बळी घेतले.

दरम्यान, वेस्ट इंडिज कडून पोलार्डने आपली अनुभवी खेळी करत संघाला 95 धावांचा टप्पा गाठून दिला. पोलार्डने 49 धावांची खेळी केली .

महत्वाच्या बातम्या-

-“मुख्यमंत्र्याचं ‘हे’ आव्हान मी स्वीकारलं”

-सत्तेसाठी पक्ष बदलणाऱ्या नेत्यांना मतदारांनी जोड्यानं मारलं पाहिजे- बच्चू कडू

-घुसखोरी करणाऱ्या पाकिस्तानला मोठा दणका; 5 ते 7 जणांचा खात्मा

-“शेतकरी आत्महत्या प्रकरणी चौकशीची मागणी मुख्यमंत्र्याकडे करणार”

-…म्हणून राष्ट्रवादीमधून भाजपमध्ये आऊटगोईंग- रामदास आठवले

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More