Top News आरोग्य कोरोना

कोरोनापाठोपाठ चीनमध्ये आणखी एक विषाणू आढळला

बिजिंग | सध्या जगभरात कोरोना व्हायरसनं थैमान घातलं आहे. तसंच यावरील लस शोधण्यासाठी जगभरातील अनेक देश प्रयत्न करत आहेत. अशा परिस्थितीत चीनमध्ये आणखी एक नवा स्वाईन फ्लू सापडल्याचा दावा संशोधकांकडून करण्यात आला आहे.

अमेरिकन सायन्स जर्नल PANS मध्ये यासंदर्भातील अहवाल प्रकाशित करण्यात आला आहे. हा नवा स्वाईन फ्लू 2009 मध्ये जगभरात पसलेल्या H1N1 चाच जेनेटिकल डिसेंडेंट असल्याचं म्हणत तो अधिक गंभीर स्वरूपाचा असल्याचा दावा करण्यात आला आहे.

नवा स्वाइन फ्लू इतका शक्तिशाली आहे की तो माणसाला आजारी पाडू शकतो. जर कोरोना साथीच्या वेळी नव्या स्वाइन फ्लूचा संसर्ग पसरला तर तो गंभीर रुप धारण करेल, असं चीनमधील अनेक विद्यापीठं आणि चीनच्या सेंटर फॉर डिजिस कंट्रोल अँड प्रिव्हेंन्शनच्या वैज्ञानिकांकडून सांगण्यात आलं आहे.

नव्या स्वाईन फ्लूला जी 4 असं नाव देण्यात आलं आहे. याचा शोध घेण्यासाठी चीनच्या वैज्ञानिकांनी 2011 ते 2018 या कालावधीत संशोधन केलं. तसंच यादरम्यान 10 राज्यांमधील 30 हजार डुकरांच्या नाकातून नमूने घेतले. तसंच या नमून्यांची तपासणीही करण्यात आली.

ट्रेंडिंग बातम्या-

धक्कादायक! लग्नाच्या दुसऱ्या दिवशीच नवरदेवाचा मृत्यू, लग्नात हजर 100 पेक्षा अधिक जणांना कोरोना

‘विठ्ठला मानवाने या संकटापुढे हात टेकले….आतातरी चमत्कार दाखव’; मुख्यमंत्र्यांची विठुरायाला साद

महत्वाच्या बातम्या-

सुशांतच्या आत्महत्याप्रकरणी आता बाॅलिवूडच्या ‘या’ प्रसिद्ध दिग्दर्शकाची होणार चौकशी

मुंबई लोकलची संख्या वाढवली, तब्बल 350 लोकल रुळावर

सत्तेत आल्यापासून शिवसेनेच्या संवेदना गोठल्या आहेत- प्रवीण दरेकर

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या