थंडीचा कडाका वाढणार; हवामान विभागाचा सतर्कतेचा इशारा

Weather Update

Weather Update l राज्यातील तापमानात गेल्या काही दिवसांत मोठा बदल (Change) दिसून येत आहे. कुठे गोठवणारी थंडी आहे तर कुठे जानेवारी (January) महिन्यातच उष्णता जाणवू लागली आहे. पुढील काही दिवसांत राज्यातील तापमानात आणखी बदल होणार असल्याचे चित्र आहे. कुठे तापमानात वाढ होईल तर काही ठिकाणी ढगाळ हवामान राहण्याची शक्यता आहे.

मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ आणि कोकणात काय स्थिती? :

राज्यात मध्य-महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तापमानात १-३ अंशांनी घट (Decrease) झाली असून थंडी वाढली आहे. तर, विदर्भातही (Vidarbha) तापमान घटले आहे. मात्र, कोकणात तापमान वाढले (Increase) आहे.

याशिवाय सध्या दक्षिणेकडील राज्यांमध्ये (Southern States) जोरदार पावसाची (Heavy Rain) शक्यता हवामान विभागाने (Meteorological Department) वर्तवली आहे. त्याचा परिणाम राज्यातील अनेक भागात दिसून येणार आहे. दरम्यान, महाराष्ट्रातील काही भागात ढगाळ वातावरण राहील. तर, येत्या तीन दिवसांत राज्यात तापमान वाढणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

Weather Update  l थंडी वाढण्याची आणि पावसाची शक्यता :

तामिळनाडू (Tamil Nadu) येथील समुद्रात (Sea) चक्राकार वाऱ्यांचा (Cyclonic Winds) प्रभाव वाढला आहे. तर, गुजरात (Gujarat), राजस्थान (Rajasthan) ते बंगालच्या उपसागरात (Bay of Bengal) नैऋत्य (Southwest) भागात पूर्वेकडून (East) वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे कमी दाबाचा पट्टा (Low Pressure Belt) तयार झाला आहे. त्यामुळे वायव्य भारतात (Northwest India) थंडी वाढली आहे. तर, दक्षिणेकडील राज्यात पावसाचा अंदाज (Rain Forecast) वर्तवण्यात आला आहे.

उत्तरेकडील राज्यांमध्ये थंडीचा जोर वाढला आहे. या सर्व गोष्टींचा परिणाम महाराष्ट्रातील हवामानावर होताना दिसून येत आहे. त्यामुळे राज्यातील तापमानात सतत चढउतार जाणवत आहेत.

राज्यातील तापमानात येत्या काही दिवसांत बदल होणार असून, नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले आहे.

News Title : Fluctuating weather conditions across Maharashtra; Temperatures to rise in next three days

 

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .