बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

राज्याच्या कोरोना आकडेवारीत चढ-उतार, वाचा आजची ताजी आकडेवारी

मुंबई | आज रूग्णांच्या संख्येत वाढ झाल्याचं चित्र समोर आलं आहे. वाढत्या कोरोना रूग्णांच्या पार्श्वभूमीवर राज्यात पुन्हा एकदा लाॅकडाऊन घोषित करण्यात आला होता. त्याचाच सकारात्मक परिणाम महाराष्ट्रात होत असताना पहायला मिळत आहे. प्रशासनाकडून निर्बंध अधिक कडक करण्यात आल्यामुळे नागरिकांचं विनाकारण घराबाहेर पडणं बंद झालं परिणामी रुग्ण संख्याही घटली होती. त्यानंतर महाराष्ट्रात नागरिकांना निर्बधांमधून सूट देण्यात आली आहे.

राज्यातील कोरोना रूग्णसंख्येत आता वाढ होताना दिसत आहे. दिवसभरात राज्यात 01 हजार 410 कोरोनाबाधित रूग्णांची नोंद करण्यात आली तर 01 हजार 520  रूग्ण कोरोनामुक्त होऊन आपल्या घरी परतले आहेत.

याशिवाय राज्यात दिवसभरात 18 रूग्णांचा मृत्यू देखील झाला आहे. राज्यात आजपर्यंत 64 लाख 35 हजार 439 बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ( रिकव्हरी रेट ) 97.46 टक्के एवढा झाला आहे.

दरम्यान, संपुर्ण महाराष्ट्रात कोरोनाच्या नव्या डेल्टा प्लस या विषाणूने डोकं वर काढलं असताना पुन्हा एकदा निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे आता कोरोना नेमका कधी संपणार? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

थोडक्यात बातम्या-

मुंबईच्या कोरोना आकडेवारीत कमी अधिक प्रमाणात घट, जाणून घ्या आजची आकडेवारी

मराठी साहित्य संमेलनावरून नियोजक आणि अध्यक्षांमध्ये पत्रापत्री वाद रंगला

भारताला जबरदस्त धक्का! भारताची सलामीवीर जोडी स्वस्तात माघारी परतली

‘गांजाच्या नशेत जर कुणी सरकार पाडण्याचा प्रयत्न करत असेल तर…’; संजय राऊतांची तुफान टोलेबाजी

“राज्य सरकार हॉटेल, लॉन्सला परवानगी देते म्हणजे तिथे काहीही धंदे करा असं सांगत नाही”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More