बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

राज्याच्या कोरोना आकडेवारीत चढ-उतार, वाचा आजची ताजी आकडेवारी

मुंबई | आज रूग्णांच्या संख्येत वाढ झाल्याचं चित्र समोर आलं आहे. वाढत्या कोरोना रूग्णांच्या पार्श्वभूमीवर राज्यात पुन्हा एकदा लाॅकडाऊन घोषित करण्यात आला होता. त्याचाच सकारात्मक परिणाम महाराष्ट्रात होत असताना पहायला मिळत आहे. प्रशासनाकडून निर्बंध अधिक कडक करण्यात आल्यामुळे नागरिकांचं विनाकारण घराबाहेर पडणं बंद झालं परिणामी रुग्ण संख्याही घटली होती. त्यानंतर महाराष्ट्रात नागरिकांना निर्बधांमधून सूट देण्यात आली आहे.

राज्यातील कोरोना रूग्णसंख्येत आता वाढ होताना दिसत आहे. दिवसभरात राज्यात 1 हजार 388 नव्या कोरोनाबाधित रूग्णांची नोंद करण्यात आली तर 01 हजार 584 रुग्ण कोरोनामुक्त होऊन आपल्या घरी परतले आहेत.

याशिवाय राज्यात दिवसभरात 36 रूग्णांचा मृत्यू देखील झाला आहे. राज्यात आजपर्यंत 64 लाख 47 हजार 038 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ( रिकव्हरी रेट ) 97.55 टक्के एवढा झाला आहे.

दरम्यान, संपूर्ण महाराष्ट्रात कोरोनाच्या नव्या डेल्टा प्लस या विषाणूने डोकं वर काढलं असताना पुन्हा एकदा निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे आता कोरोना नेमका कधी संपणार? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

थोडक्यात बातम्या-

पीएफ खातेदारांसाठी मोठी बातमी! ऐन दिवाळीपूर्वी मिळणार तब्बल ‘इतके’ टक्के व्याजदर

‘आता तरी सरकारला जाग येणार का?’;’त्या’ घटनेवरून प्रविण दरेकरांचा संतप्त सवाल

“चीनवर बोलणारे सर्वज्ञानी संजय राऊत पंढरपूरवर गप्प का?”

सोनं खरेदी करणाऱ्यांना दिलासा; वाचा आजचा सोने-चांदीचा ताजा भाव

“अख्खा महाराष्ट्र राष्ट्रवादीमय करण्याचं आमचं ध्येय”

“कलेक्टर आहे ‘तो’ शिवसेनेचा, सगळ्यांचे पैसे गोळा करतो”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More