बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत पुन्हा वाढ; गेल्या 24 तासातील आकडेवारी चिंताजनक

नवी दिल्ली | गेल्या काही दिवसात अनेक राज्यांनी लाॅकडाऊन शिथिल केलं आहे. त्यामुळे आता कोरोना रूग्णसंख्या काहीशी वाढल्याचं दिसत आहे. गेल्या 24 तासात आधीच्या दिवसाच्या तुलनेत कोरोना बाधितांच्या संख्येत पाच हजारांनी वाढ झाली आहे. देशातील ही सक्रिय रूग्णसंख्या 71 दिवसांच्या निचांकी आकड्यावर आली आहे.

गेल्या 24 तासात भारतात 67 हजार 208 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. काल दिवसभरात मृतांचा आकडाही काही प्रमाणात कमी झाला आहे. गेल्या 24 तासांमध्ये 2 हजार 330 रुग्णांनी प्राण गमावले आहेत. काल देशात 1 लाख 3 हजार 570 जण कोरोनामुक्त होऊन घरी गेले आहेत.

भारतातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा आता 2 कोटी 97 लाख 313 वर पोहोचला आहे. देशात 2 कोटी 84 लाख 91 हजार 670 रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत 3 लाख 81 हजार 903 रुग्णांनी कोरोनामुळे प्राण गमावले आहेत. तर 8 लाख 26 हजार 740 इतके सक्रिय रुग्ण सध्या भारतात आहेत.

देशात सलग आठवडाभर कोरोना विषाणूमुळं संक्रमित झालेले रुग्ण बरे होण्याचं प्रमाण अधिक आहे. देशातील कोरोना रिकव्हरी रेट 95 टक्क्यांहून जास्त झाला आहे. सक्रिय रुग्णसंख्येचं प्रमाण 4 टक्क्यांपर्यंत कमी झालं आहे. सक्रिय कोरोना रुग्णांच्या बाबतीत भारत तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. तर एकूण बाधितांच्या बाबतीत भारत दुसऱ्या स्थानावर आहे.

थोडक्यात बातम्या-

“…तर शिवसेना आणि राष्ट्रवादीला महाराष्ट्र हिताचा विचार करून एकत्र लढावं लागेल”

…तरच मराठ्यांना आरक्षण मिळेल- प्रकाश आंबेडकर

‘…तर लशीचाही फारसा काही उपयोग होणार नाही’; तज्ज्ञांनी व्यक्त केली चिंता

“उद्धव ठाकरे मोदींसमोर नाक घासून आलेत, तुम्ही कोणाच्या जोरावर छाती फुगवताय?”

संभाजीराजेंना मुख्यमत्र्यांचं बोलावणं, सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष बैठकीकडे!

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More